Premium

माणुसकीला काळीमा! रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्याला व्हॅन चालकाने मुद्दाम चिरडलं, व्हायरल VIDEO पाहताच प्राणीप्रेमी संतापले

व्हॅन चालकाने एका कुत्र्याला मुद्दाम व्हॅनखाली चिरडल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.

driver deliberately crushed a dog standing on the road
रस्ता ओलांडणाऱ्या कुत्र्याला व्हॅन चालकाने मुद्दाम चिरडलं. (Photo : Twitter)

रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. कारण निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. जगभरात दररोज हजारो रस्ते अपघात होत असतात. या अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांनादेखील निष्काळजीपणे वाहन चालकांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो, याबाबतची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. पंरतु सध्या ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे येथील एका ड्रायव्हरने मुद्दाम एका कुत्र्याला व्हॅनखाली चिरडलं आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्ता ओलांडताना दिसत आहे. यावेळी कुत्र्याला समोरुन येणारी व्हॅन दिसते त्यामुळे तो जागीच थांबतो आणि ज्या बाजूने आला तिकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओत दिसत आहे की, व्हॅन आणि कुत्रा यांच्यामध्ये बरेच अंतर आहे. पण यावेळी ड्रायव्हर मुद्दाम त्याची व्हॅन लेनमधून बाहेर काढतो आणि कुत्र्याच्या अंगावर घालतो. यावेळी कुत्रा व्हॅन आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुर्दैवाने तो व्हॅनखाली सापडतो.

हेही वाचा- कमी वेळात जास्त दारु पिणं जीवावर बेतलं; २ लाखांसाठी गमावला जीव, संपूर्ण प्रकरण वाचून थक्कच व्हाल

कुत्र्याला जाणूनबुजून चिरडलं –

ड्रायव्हरने असं कृत्य का केलं याबाबतची काही माहिती समोर आलेली नाही. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर ड्रायव्हरने मुद्दाम कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. तर कुत्र्याला व्हॅनखाली चिरडल्यानंतर ड्रायव्हर आपली व्हॅन घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्राणीप्रेमी चांगलेच संतापले आहेत. तसेच या घटनेत संपूर्णपणे ड्रायव्हरची चूक असल्याचंही प्राणीप्रेमी म्हणत आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओची दखल घेत दादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषी ड्रायव्हरवर आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog crossing the road was deliberately crushed by a van driver animal lovers are outraged after seeing a viral video jap

First published on: 05-10-2023 at 17:55 IST
Next Story
काय सांगता?…म्हणे अख्खं बस स्टॉप चोरीला गेलं; १० लाखांचं आठ दिवसापूर्वीच केलं होतं काम