poster viral: ‘मुलाला शेती पाहिजे; पण तो शेतात जाणार नाही’ मुलगा पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा असावा. शहरात स्थायिक असावा. अशी मानसिकता मुलींबरोबर त्यांच्या आई-वडिलांचीही झाली आहे. तर मुलाचे लग्न ठरत नसल्याने शेतकरी मातापित्याच्या जिवाला घोर लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था मुलांचे विवाह जमत नसल्याने बिकट झाली आहे. दरम्यान याच सगळ्या अपेक्षांना वैतागलेल्या एक शेतकरी तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही या तरुणाचं कौतुक कराल. सध्या या तरुणाचा पोस्टर घेऊन असलेल्या फोटो जोरदार व्हायरल होतोय.
लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या तरुणानं चोख उत्तर दिलंय. भर चौकात तरुण हातात पोस्टर घेऊन उभा आहे. येणारे जाणारे सगळे लोक हे पोस्टर पाहून थांबत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर “मुलाला शेती पाहिजे; पण शेतात काम करणार नाही” “वाह रे दुनिया” असा टोला लिहला आहे.
हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दिर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्यात फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहे. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच समाजांत मुलींचे प्रमाण घटत आहे. अशातच मुलींचे शिक्षण वाढत असल्याने अनेक मुलींना आपल्याला अनुरूप मुलगाच हवा असतो. या वाढत्या अपेक्षेमुळे मात्र अल्पशिक्षित मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ येते. मात्र कधी कधी मुलींच्या अपेक्षा नको तेवढ्या असतात. अशाच एका तरुणानं हा राग पोस्टरवर व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “काय रे केदारनाथला दारू प्यायला आलात?” गोंधळ घालणाऱ्या तरुणांना चांगलंच खडसावलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
हा फोटो comedy_wala_basu या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केलीय की, “एकदम बरोबर”, तर दुसऱ्यानं कमेंट केली की, “मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांवर अविवाहित राहण्याची वेळ आलीय.”