Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कदायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की अंगावर काटा येतो सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये मेट्रोच्या डब्ब्यात प्रवेश करताना एक आई आणि बाळ दिसत आहे. पुढे व्हिडीओत असे काही दिसते की तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला तिच्या बाळाला बाबा गाडीमध्ये बसवून मेट्रोमध्ये जाताना दिसते. ती सुरुवातीला मेट्रोच्या आत जाते आणि त्यानंतर बाबा गाडीमध्ये बसलेल्या बाळाला आत घेण्याचा प्रयत्न करते पण बाबा गाडी अडकते त्यामुळे मेट्रोच्या डब्ब्यात बाबा गाडी ओढता येत नाही. अचानक मेट्रोचा दरवाजा बंद होतो आणि बाळ बाहेर तर आई मेट्रोच्या आतमध्ये असते आणि मेट्रो निघून जाते आणि बाळ मात्र स्टेशनवर तसेच बाबा गाडीमध्ये बसलेले असते.

Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Helmet save bike rider's life
बाईक चालवताना डोक्यावर आदळला जेसीबीचा पत्रा; VIDEO पाहून तुम्ही देखील हेल्मेटशिवाय घराबाहेर पडणार नाही
Dubai Floods Tesla boat-mode? Dubai hit by two years' worth of rain in a single day
Dubai Flood: दुबईच्या महापुरातही टेस्ला गाडीनं केली कमाल; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

हा सर्व प्रकार स्टेशनवर बसलेला बेघर व्यक्ती बघत असतो. तो त्या बाळाजवळ जातो आणि त्याच्याबरोबर खेळताना दिसतो आणि व्हिडीओ इथेच संपतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सार्वजानिक वाहतूकीने प्रवास करताना महिलांनी बाळ सांभाळताना काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : VIDEO : चक्क बर्फाचा गोळा सर्व्ह करतोय रोबोट, आता रोबोट वेटरची जागा घेणार? व्हिडीओ होतोय व्हायरल

Enez Özen या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” सार्वजानिक वाहतूकीने प्रवास करताना बाळाबरोबर असलेल्या आईनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिने बाबा गाडी ओढण्यापेक्षा बाळाला उचलायला पाहिजे होते.” तर एका युजरने बेघर माणसाविषयी लिहिलेय, “माणूसकी अजूनही जीवंत आहे” हा व्हिडीओ खरा नसल्याचे काही युजर्सनी लिहिलेय. एक युजर लिहितो, “ही एक स्क्रिप्ट आहे..हा व्हिडीओ फेक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ सीसीटिव्ही कॅमेरामधील नाही तर स्मार्टफोनमधील कॅमेरात शूट केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा नाही”