How To Check Spices Purity: मोदीनगर, गाझियाबाद येथील मसाल्याच्या गिरणीवर अचानक छापे मारत अधिकाऱ्यांनी एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. या गिरणीत कपड्यांसाठी वापरण्यात येणारे औद्योगिक रंग हळद आणि मिरची पावडरमध्ये मिसळले जात होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना याठिकाणी ‘फक्त औद्योगिक वापरासाठी’ आणि ‘विषारी’ असे स्पष्टपणे लेबल केलेल्या कृत्रिम रंगांची अनेक पाकिटे आढळून आली. अशोक गर्ग या व्यावसायिकाच्या मालकीच्या ‘अन्नपूर्णा फ्लोअर मिल’ मध्ये सदर प्रकार घडल्याचे समजत आहे.

अधिकाऱ्यांनी गिरणीच्या आवारातून अंदाजे २०० किलो भेसळयुक्त हळद आणि १५० किलो भेसळयुक्त लाल मिरची पावडर जप्त केली आहे. हे मसाले मोठ्या प्रमाणात ढाबे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयांना विकले जात होते. मागील शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मालकाच्या विरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नव्हती मात्र अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार, या प्रकरणी, पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती.

Kitchen Sink Cleaning Tips
Kitchen Jugaad: रात्री झोपण्यापूर्वी एकदा किचन सिंकमध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टी टाकून पाहा; तुमची मोठी समस्या होईल दूर!
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
ayurvedic hair care tips and benefits
Hair care : केसगळतीवर ‘या’ आयुर्वेदिक औषधी ठरतील उपयुक्त! पाहा त्यांचे वापर अन् फायदे….
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न

दरम्यान, या परिसरात आधी सुद्धा अशा प्रकारच्या कारवाया झाल्या होत्या. त्यावरून सतर्क होऊन गिरणीच्या मालकाने अगोदरच भेसळयुक्त साठा लपवला असावा असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. छापेमारी दरम्यान जप्त केलेले नमुने भेसळीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी लखनऊमध्ये चाचणीला पाठवण्यात आले आहेत. तुम्हाला माहित आहे का, अशाप्रकारची शुद्धतेची चाचणी आपण घरच्या घरी सुद्धा करू शकता. तुमच्याकडील हळद, लाल तिखट शुद्ध आहे का कसे ओळखायचे हे पाहूया..

हळद, लाल तिखट शुद्ध आहे का?

हळद (हळदी पावडर)

एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा हळद घाला, नीट ढवळून घ्या. मिश्रण १० मिनिटे बसू द्या. जर हळद शुद्ध आणि भेसळयुक्त नसेल तर ती काचेच्या तळाशी कोणताही गाळ न राहता पाण्यात पूर्णपणे विरघळते.

मिरची पावडर

मिरची पावडर पाण्यात मिसळा आणि ५ मिनिटे स्थिर होऊ द्या. काचेच्या तळाशी गाळ साचेल त्यातील काही भाग घ्या तळव्यांनी घासून पाहा जर तो दाणेदार, टोकेरी किंवा साबणासारखा वाटत असेल तर मिरची पावडर भेसळयुक्त आहे असे समजा.

जिरे

दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये जिऱ्याचे दाणे ठेवून घासून पाहा जर त्यातून हातावर काळा रंग उतरत असेल तर जिरे भेसळयुक्त आहे, असे समजा.

काळी मिरी

पाण्यात काळी मिरी घाला, स्थिर होऊ द्या. जर मिरी पाण्यात बुडत असेल तर काळी मिरीमध्ये पपईच्या बियांची भेसळ आहे हे ओळखा.

धणे

पाण्यात एक चमचा धणे टाका आणि नीट ढवळून घ्या. धण्यामध्ये भुसा किंवा शेणाची भेसळ सर्वाधिक आढळते. भुसा किंवा शेण पाण्यात तरंगते त्यामुळे धणे पाण्यात बुडतायत का हे बघा.

हे ही वाचा<< दररोज ‘इतक्या’ प्रमाणात पिस्ता खाल्ल्याने लैंगिक शक्ती होते बूस्ट? तज्ज्ञांनी सांगितली अचूक माहिती व प्रमाण

मसाल्यांचा वाद काय आहे?

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतीय मसाले हे जगभरात वादाचा मुद्दा ठरत आहेत सिंगापूर, हाँगकाँग आणि मालदीव सारख्या देशांनी इथिलीन ऑक्साइडमुळे MDH आणि एव्हरेस्ट या प्रसिद्ध भारतीय ब्रँडच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक कीटकनाशक आढळल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर FSSAI ने देखील या मसाल्यांवर तात्पुरती बंदी घालून चाचण्यांना सुरुवात केली आहे.