Viral Video : आजकालच्या वेगवान जीवनामध्ये बाजारात मिळणारे तयार पदार्थ अनेकांची पहिली पसंती ठरते. पण, अशातच अनेकजण निरोगी राहण्यासाठी आणि हेल्दी खाण्यासाठी बाजारातून काही पदार्थ विकत न घेता घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असच काहीसं पहायला मिळालं आहे. एका व्यक्तीने कोणताही पदार्थ नाही, तर समुद्राच्या पाण्यापासून नैसर्गिक मीठ घरच्या घरी तयार केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीठ तयार करण्यासाठी व्यक्ती सगळ्यात आधी प्लास्टिकच्या बोटीमधून समुद्रात जाते. त्यानंतर कंटेनरमध्ये समुद्रातील पाणी भरून घेते व घरी येते आणि पाणी गाळणीतून गाळून घेते. गाळून घेतलेलं पाणी गॅसवर एका भांड्यात उकळून घेते. पाणी उकळायला ठेवल्यावर हळूहळू पाण्याची पातळी कमी होते आणि भांड्यात शेवटी फक्त मीठ शिल्लक राहते. राहिलेले मीठ व्यक्ती ओव्हनमध्ये भाजून घेतो आणि अशाप्रकारे घरच्या घरी मीठ तयार होते. व्यक्तीने घरच्या घरी मीठ कशाप्रकारे तयार केलं, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच..

हेही वाचा… ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची कोकणामध्ये भजनातही क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

तरुणाने बनवलं समुद्री मीठ :

मीठ हा अन्नाचा एक महत्वाचा भाग आहे. कारण- पदार्थांना मिठामुळे चव येते, तर मिठाच्या जास्त प्रमाणामुळे अन्नाची चवसुद्धा बिघडू शकते. अशातच आरोग्य सांभाळून मिठाचे योग्य सेवन करणे गरजेचे असते. तसंच काहीसं लक्षात ठेवून तरुणाने हा व्हिडीओ बनवला आहे आणि व्हिडीओत पाण्यापासून नैसर्गिक मीठ तयार केलं आहे; जे तुम्ही घरीसुद्धा वापरू शकता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडीओ @TansuYegen या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घरच्या घरी तयार केलेलं मीठ पाहून अनेकजण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. काही जणांना हा उपाय बेस्ट वाटतोय, तर काही जण हे खूपच खर्चिक आहे, असे मत मांडताना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person has prepared natural salt at home from sea water asp
First published on: 23-09-2023 at 17:12 IST