Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण आपली कला दाखवतात. कोणी डान्स करताना दिसतात तर कोणी गाणी म्हणताना दिसतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी डान्स करताना दिसत आहे. एका कार्यक्रमात हा पोलिस अधिकारी मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पोलिस हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक नागरीक सुरक्षित राहावा, यासाठी पोलिस २४ तास काम करत असतात. अनेकदा त्यांच्याजवळ स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी वेळ नसतो पण हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

हेही वाचा : ‘आज या ठिकाणी…’ तरुणाने हुबेहूब केलेली अजित पवारांची नक्कल पाहून आवरणार नाही हसू; VIDEO नक्की पाहाच!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कार्यक्रमात पोलिस अधिकारी डान्स करताना दिसत आहे. त्याने पोलिसाची वर्दी घातलेला नाही म्हणजेच हा पोलिस अधिकाऱ्याच्या खाजगी कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे, असे दिसून येतेय. व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला तो डान्समध्ये पारंगत असल्याचे दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या पोलिस अधिकाऱ्याचे नाव संदिप शर्मा आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार – तो मुळचा मथुरेचा आहे आणि उपनिरीक्षक आहे. त्याचे १,३३००० फॉलोवर्स असून तो खूप चांगला डान्सर आहे. तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : उन्हापासून संरक्षणासाठी बनविला चालता-फिरता Cooler; तीन चाके लावली अन्… पाहा VIDEO

shiv_upcops आणि supercop_sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पहिल्यांदा पोलिसांना डान्स करताना पाहून छान वाटले” तर एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “शर्माजीचा मुलगा काहीही करू शकतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “सूपर डान्सर, डान्स पाहून तुमचा चाहता झालो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.