Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी कोणाची नक्कल करताना दिसतो. प्रत्येक जण सोशल मीडियावर कला सादर करताना दिसतो. सध्या अशाच एक तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणाने व्हिडीओमध्ये हुबेहूब अजित पवारांची नक्कल केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा तरुण अजित पवारांसारखा बोलताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये या तरुणाने हुबेहूब अजित पवारांची नक्कल केली आहे. पत्रकार परिषदेत अजित पवार जसे बोलतात, तसे सेम टू सेम या तरुणाने बोलून दाखवले आहे. अजित पवार यांच्यासारखा आवाज काढत त्यांच्याच बोलण्याच्या शैलीत हा तरुण नक्कल करत आहे. तुम्ही जर अजित पवारांचे पत्रकार परिषदमधील सर्व भाषण ऐकले किंवा पाहिले असेल तर तुम्हाला जाणवेल की हा तरुण हुबेहूब त्यांची नक्कल करत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाच्या शेजारी दोन तरुण उभे आहेत आणि व्हिडीओमध्ये काही जण त्यांना प्रश्न विचारत आहे. त्यावर हा तरुण अजित पवारांची नक्कल करून उत्तर देताना दिसतो.त्याचे हातवार आणि चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा हुबेहूब अजित पवारांसारखे दिसताहेत.

हेही वाचा : Video : तब्बल १५ वर्षानंतर भेटली मैत्रीणीला! पाहा तो सुंदर क्षण, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल तुमचे मित्र- मैत्रीणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

shubam_takalkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अजित दादा पत्रकार परिषद” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती वेळ बघू रे शुभम काय भारी केलंय हा रील खरंच” तर एका युजरने लिहिलेय, “शुभ्या जोमात अजित दादा कोमात” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाद खुळा दादा मस्त, खूप हसलो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही लोकांनी या तरुणाला अजित दादा समजून मजेशीर प्रश्न विचारली आहेत आणि या प्रश्नाला या तरुणाने अजित पवारांच्या शैलीत उत्तरे दिली आहे.