Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मजेशीर घटना व्हायरल होत असतात तर कधी थक्क करणाऱ्या घटना व्हायरल होतात. काही व्हिडीओ तर इतके धक्कादायक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरूणी थोडक्यात वाचली. जागेवरून उठताच धाडकन फॅन पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a student luckily survived as she got up from her seat the fan fell down)

अनेकदा आपल्या आजुबाजूला लहान मोठे अपघात घडताना दिसतात. काही अपघात खूप धक्कादायक असतात. अनेकदा हा अपघात कसा घडला हे सुद्धा कळत नाही. काही लोक अपघातातून मरता मरता वाचतात. या व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला हेच दिसेल की तरुणीचे नशीब चांगले होते म्हणून ती वाचली. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

A young woman wearing a saree sits on a bike and cuts the youths
हिचा नाद खुळा! तरुणी साडी नेसून बाईकवर बसली अन् भररस्त्यात तरुणांना कट मारत…; Viral Video पाहून युजर्स म्हणाले, “रायडिंग नाही स्टायलिंग”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Viral Video Of chimpanzee adorably picking up a puppy in its hands and holding it close to itself Must Watch
VIDEO: कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? चिंपांझीने पिल्लाला घेतलं जवळ अन्…असं दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असेल
A old man Dance In The village Video Goes Viral On Social Media Trending
नाद पाहिजे ओ, नादाशिवाय काय हाय; भर गर्दीत आजोबांनी लावणीवर धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल वाहह!
Water Tap Desi Jugaad
घरातील नळाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड; नळाला लावलं चक्क…; अन्…पाहा Video 
Accident Shocking Video
पाठीमागून मृत्यू आला अन्…अचानक रस्त्यावर थरारक अपघात; पण चूक कुणाची? VIDEO पाहून चक्रावून जाल
bujgavne viral video trending video farmer installed scary scarecrow in his field video goes viral on social media
शेतातला ‘हा’ भयानक VIDEO पाहून फुटेल घाम; रात्री पाहाल, तर उडेल कायमची झोप; असे आहे काय त्यात?
Deshi Jugaad Video
VIDEO: याला म्हणतात जुगाड! माठातील पाणी पिण्याची ‘अशी’ सोय पाहून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा Video पाहाच

या व्हायरल व्हिडीओ एका क्लासमधील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की परिक्षा सुरू आहे आणि प्रत्येक बाकावर एक एक विद्यार्थी बसलेला दिसत आहे. एका बाकाच्या वर फॅन लावलेला दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्या बाकावरील तरुणी उठते आणि उत्तरपत्रिका द्यायला जााते तेव्हा उठल्यानंतर काही क्षणातच फॅन तिच्या जागेवर पडतो आणि ती थोडक्यात वाचते. जर तरुणी उठली नसती तर कदाचिक फॅन तिच्या डोक्यावर पडला असता आणि तिला गंभीर दुखापत झाली असती. हा व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही स्तब्ध व्हाल. काही लोकांच्या अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आयुष्यात एवढं नशीब पाहिजे” खरंय त्या तरुणीचे नशीब चांगले होते म्हणून ती थोडक्यात वाचली नाहीतर खूप मोठा अपघात घडला असता.

हेही वाचा : “काय रे केदारनाथला दारू प्यायला आलात?” गोंधळ घालणाऱ्या तरुणांना चांगलंच खडसावलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?

पाहा व्हायरल व्हिडीओ

marathi_epic_jokes या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिचे कर्म चांगले असतील.” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्याबरोबर पण सेम असेच झाले होते. खूप नशीबाने वाचले.” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “मला तर मुलगीच भूत वाटते”