Viral video: फूड व्लॉगर्सचे व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही खाद्यपदार्थ विक्रेते लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामुळे कुठलीही रेसिपी वापरून काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा परिस्थितीत, मसाल्यांऐवजी, ते कधीकधी अशा गोष्टी वापरतात की पाहून ते खावंसच नाही वाटत. तंदूरी चिकन, चिकन टिक्का आणि इतर अनेक चिकन रेसिपी तुम्ही आतापर्यंत खाल्ल्या असतीलच..या चिकनच्या सगळ्या रेसिपी बनवण्यासाठी वेगवेगळे मसाले वापरले जातात. पण तुम्ही कधी दारूमध्ये मॅरीनेट केलेले चिकन खाल्ले आहे का? जर तुम्ही ते खाल्ले नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते चिकन कसे बनवले जाते ते दाखवणार आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे सर्व पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जयपूर, राजस्थानचा आहे. ज्यामध्ये एक विक्रेता सोमरस नावाच्या दारूमध्ये चिकन मॅरीनेट करताना दिसत आहे. एका मोठ्या भांड्यात चिकन घेतले असून विक्रेता त्यात राजस्थानची देशी दारू टाकताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विक्रेत्याने याला टांगरी मुर्ग असे नाव दिले असून लोक मोठ्या आवडीने ते खायला येतात असे तो सांगतो. तसेच हे खाण्यासाठी लोकांची मोठी रागं लागते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘ती’ अशी बचावली, पाहा थरारक VIDEO

dilsefoodie नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत ४ लाख ८१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे. यावर युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले… यापेक्षा वाईट अन्न मी कधीच पाहिले नाही. दुसऱ्या युजरने लिहिले… जिवंत कोंबडीला दारू प्यायला दिली असती तर बरे झाले असते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… तुम्ही लोक हे काय करताय.