सध्या चीनमध्ये एशियन गेम्सचे वेगवेगळ्या खेळांमधले सामने होत आहेत. त्यात क्रिकेटचाही समावेश आहे. जगभरात हजारो आणि प्रसंगी लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेटपटू आपलं कौशल्य पणाला लावत असतात. पण जिथे क्रिकेट म्हणजे काय? असाच प्रश्न अनेकांना पडतो,अशा चीनमध्ये होणाऱ्या सामन्यांकडे चिनी प्रेक्षक नेमका कसा बघत असेल? क्रिकेटबद्दल, यातल्या नियमांबद्दल, खेळाच्या स्वरूपाबद्दल चिनी प्रेक्षकांचं काय म्हणणं असेल? इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात विशेष वृत्त प्रकाशित केलं आहे.

१३४७ क्षमतेच्या स्टेडियममध्येही अनेक खुर्च्या रिकाम्या!

यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी गोल्ड मेडलसाठीच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला आणि भारताच्या खात्यात आणखी एका गोल्ड मेडलचा समावेश झाला. हा सामना जर नियमित क्रिकेट खेळलं जाणाऱ्या एखाद्या देशात भरवला असता, तर त्याला हजारो प्रेक्षक, त्यांच्या लाखो घोषणा, आपापल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अगदी स्टेडियम दणाणून सोडणारे प्रेक्षक असं सारं वातावरण असतं. पण चीनमध्ये वेगळंच चित्र होतं!

Virat Kohli Run out to Shahrukh khan with rocket throw video Cameron Green Reaction
IPL 2024: विराट कोहलीचा भन्नाट रॉकेट थ्रो अन् शाहरूख खान असा झाला रनआऊट, ग्रीनच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, VIDEO व्हायरल
Ruturaj Gaikwad Statement on Toss
IPL 2024: ऋतुराज म्हणतो, ‘टॉसचं येतं दडपण, सरावावेळी करतो टॉसची प्रॅक्टिस’
Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल

चीनच्या हँगझो गेम्स भागात असणाऱ्या टेक्नोलॉजी विद्यापीठाच्या आवारात हे स्टेडियम उभारण्यात आलं आहे. अवघ्या १३४७ प्रेक्षकांची क्षमता असणाऱ्या या स्टेडियममध्ये फायनल मॅचसाठीही अनेक खुर्च्या चक्क रिकाम्या होत्या! अंतिम सामन्याचं तिकीट होतं अवघे ५० युआन (५७५ रुपये)! आणि मॅच बघण्यासाठी आलेले प्रेक्षक एक तर उत्सुकता म्हणून आले होते किंवा अपघातानेच!

रन्स नव्हे, पॉइंट्स!

एका रेस्टराँचे मालक असणारा असणारा २६ वर्षीय जिन एन पिंग या सामन्यासाठी फक्त हे बघायला आला होता की भारतीय खरंच एवढे भारी खेळतात का जेवढं प्रत्येकजण सांगत असतो! पिंग म्हणतो, “एशियन गेम्सपूर्वी मी या खेळाबद्दल ऐकलंही नव्हतं. पण ही फायनल होती आणि भारतीय संघ खेळत होता म्हणून मी आलो. मला १ पॉइंट, ४ पॉइंट, ६ पॉइंटमधला फरक कळतो. हा थोडाफार बास्केटबॉलसारखाच खेळ आहे ज्यात खूप स्टॅमिना आणि धावायची गरज असते!”

(स्मृती) मानधना देवी…!

मॅच संपायच्या आधीच स्टेडियममध्ये आलेले बहुतेक चिनी प्रेक्षक निघून गेले होते. मागे राहिलेल्यांपैकी यिवू प्रांतात राहणारे काही गुजराती व्यावसायिक आणि बिजिंगहून खास हे सामने पाहाण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले काही क्रिकेटवेडे चिनी प्रेक्षक होते. २५ वर्षीय जून्यू वेई म्हणतो, “मी भारतीय संघाचा खूप मोठा फॅन आहे. २०१९मध्ये मी पहिल्यांदा टीव्हीवर क्रिकेट पाहिलं. ती वर्ल्डकपची मॅच होती. तेव्हापासून मी या खेळाच्या प्रेमातच पडलो”. सामन्यानंतरचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडेपर्यंत वेई तिथेच थांबला होता. वेईच्या हातात एक फलक होता आणि त्यावर लिहिलं होतं ‘मानधना देवी’!