वाचनाची आवड असणाऱ्या अनेकांना सतत आपल्या हाताशी एखादे चांगले पुस्तक असावे असे वाटत असते. तर कानसेनांनाही त्यांच्या आवडीची गाणी ऐकण्याची नेहमीच इच्छा असते. अशा या रसिक मंडळींची प्लेलिस्ट किंवा त्यांचा किताबखाना कधीच तुम्हाला रिकामा दिसणार नाही. नेहमीच विविध व्यक्तींकडून त्यांच्या आवडीची पुस्तकं, आवडीची गाणी या साऱ्याविषयी विचारपूस करणाऱ्यांच्या हाती आता एक सुवर्णसंधी लाभली आहे. कारण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीच्या पुस्तकांच्या आणि गाण्यांच्या यादीवरुन त्यांनी पडदा उचलला आहे.

रविवारी ओबामा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन ही यादी जाहीर केली. ‘राष्ट्राध्यक्ष पदावर असल्यापासूनच मी अशा प्रकारची यादी पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. यंदाच्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये सर्वाधिक भावलेल्या गाण्यांची आणि पुस्तकांची यादी मी शेअर करतोय’, असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले.

ओबामा यांनी पोस्ट केलेल्या या यादीत १२ पुस्तकांचा समावेश असून, त्यात काल्पनिक कथांवर आधारित पुस्तकांचीही नावे आहेत. पुस्तक प्रेमींसाठी ही यादी खास भेट ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. फक्त वाचकच नव्हे तर, संगीतप्रेमींसाठीसुद्धा ही यादी खास ठरत आहे. त्यामुळे नव्या वर्षात तुमच्या प्लेलिस्टमध्ये थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या आवडीच्या गाण्यांचा समावेश करु इच्छिताय तर मग ही यादी पाहाच…

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल