Viral Video: जुनं ते सोनं’, असं बऱ्याचदा आपण म्हणतो. कारण, आपण कितीही मॉडर्न काळात वावरत असलो तरीही तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असेल की, ९० च्या दशकातील अशा बऱ्याच गोष्टी, वस्तू, गाणी, कपडयांची स्टाईल आदी गोष्टी आपण सगळेच सध्याच्या मॉडर्न काळात ट्रेंड म्हणून वापरत आहोत. आजसुद्धा अनेक जण जुन्या काळातील विविध गोष्टींना तितकंच महत्त्व देताना दिसत आहेत. तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळालं. एक वृद्ध व्यक्ती ९० च्या दशकातील एका प्रसिद्ध गाणं सादर करताना दिसले आहेत.

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान आणि जुही चावलाचा यस बॉस (Yes Boss) या चित्रपटातील ‘मैं कोई ऐसा गीत गाऊँ’ हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. तर व्हिडीओत हे गाणं आज एक आजोबा सादर करताना दिसले आहेत. आजोबांनी गिटार हातात घेऊन, अगदी खास हावभाव देत हे गाणं सादर केलं आहे.बोटांनी तारा छेडून गायलेलं आजोबांच्या आवाजातील ‘मैं कोई ऐसा गीत गाऊँ गाणं नक्की ऐका.

हेही वाचा…पायलटच्या आजी-आजोबांचा पहिला विमानप्रवास; नातवानं केलं तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘तुमच्या बाईकवर खूप …’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रात्रीची वेळ असते. मस्त शेकोटी पेटवण्यात आलेली असते आणि या खास वातावरणात आजोबा खुर्चीवर बसून, अंगावर शॉल ओढून, गिटार हातात घेऊन हे गाणं सादर करताना दिसत आहेत ; जे ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. व तुम्हाला हे गाणं वारंवार ऐकावसं वाटेल एवढं नक्की. तेथे उपस्थित एका व्यक्तीने हा सुंदर क्षण स्वतःच्या फोनमध्ये कैद करून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @guitarwithghouse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आजोबांच्या या खास कौशल्याचे तसेच त्यांच्या मधुर आवाजाचे कमेंटमध्ये कौतुक करताना दिसत आहेत. तर काही जणांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजोबांची आठवण आली असे सुद्धा आवर्जून सांगताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.