बालपणीच्या अनेक आठवणी आजही समोर आल्या की आपण नेहमीच नॉस्टॅल्जिक होतो. यामध्ये बिस्किटांपासून कँडीपर्यंत, चिप्सपासून पेयांपर्यंत असे अनेक खाद्यपदार्थ होते जे तुमच्या आमच्या बालपणी आवडीच्या नक्कीच होत्या. त्यापैकीच बोर्बन बिस्किट हेसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. चॉकलेट क्रीमने भरलेल्या या बिस्किटामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उमटल असे. दरम्यान, आता ब्रिटानियाच्या या बिस्किटांच्या आकाराबाबत सोशल मीडियावर वाद सुरू आहे. अनेकांना असे वाटत आहे की ब्रिटानियाची बोर्बन बिस्किटे पूर्वीपेक्षा लहान झाली आहेत. मात्र, आता कंपनीनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या ट्विटने झाली. बोर्बन बिस्किटचा फोटो ट्विट करत वीर संघवी यांनी त्याच्या आकाराबद्दल चिंता व्यक्त केली. “बोर्बन बिस्किटे पूर्वी मोठ्या आकारात येत होती का? ही माझी कल्पनाशक्ती आहे की लोभ?”, असे संघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

khalistani sikh
खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचल्याचा आरोप, कोण आहेत विक्रम यादव?
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

वीर संघवी यांच्या या प्रश्नाचे उत्तर ब्रिटानियाने दिले आहे. बिस्किटांच्या आकारात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. आम्हाला माहित आहे की तुमच्या अपेक्षा जास्त आहेत. यानंतर वीर संघवींनी दुसरा प्रश्न विचारला, “कधीपासून बदल झाला नाही?”

यावर कमीतकमी गेल्या ६ वर्षांपासून आकारात कोणताही बदल झालेला नाही. आम्हाला आशा आहे की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त बिस्किटे वापरत आहात, असे ब्रिटानियाने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्राही ट्विटरवर बिस्किटांच्या आकाराच्या चर्चेत सामील झाल्या आहेत.

ब्रिटानियाचे ऑरेंज क्रीम बिस्किट बाजारात उपलब्ध नसल्याबद्दल महुआ मोईत्रा यांनी वीर संघवी यांच्याकडे दुखः व्यक्त केले. यासोबतच त्यांनी ब्रिटानियाला टॅग करत कृपया, तुम्ही माझे बालपणीचे आवडते ऑरेंज क्रीम बिस्किट परत आणा, असे म्हटले आहे.