Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण कुत्रा मांजरीचे व्हिडीओ आवडीने शेअर करतात. मांजर उंदीर खाते त्यामुळे उंदीर नेहमी मांजरीपासून दूर पळताना दिसतो. त्यामुळेअसं म्हणतात की उंदीर आणि मांजरीचे पटत नाही पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये उंदीर आणि मांजरीच्या अनेक लहान मोठ्या क्लिप्स दाखवल्या आहेत. या व्हिडीओतील त्यांची मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या मांजर आणि उंदरांची मैत्री दाखवली आहे. व्हिडीओत सुरुवातीला एक मांजर दिसेल जी उंदराबरोबर खेळताना दिसत आहे. पुढे एक मांजर उंदराच्या अंगावर डोकं ठेवून शांत झोपलेली दिसत आहे. एक मांजर उंदराच्या मागे धावत आहे तर एक मांजर उंदराला कुशीत घेऊन बसलेली दिसत आहे. पुढे व्हिडीओत एक मांजर उंदराबरोबर लपंडाव खेळताना दिसत आहे. तर एक मांजर उंदराशी भांडताना दिसत आहे. व्हिडीओतील उंदरांची आणि मांजरांची मैत्री पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या घरच्या पाळीव प्राण्यांची कुत्रा मांजरीचे आठवण येऊ शकते. उंदीर मांजरीचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांना टॉम अँड जेरीची पण आठवण येईल.

हेही वाचा : Video : इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘चॉकलेट चीज वडापाव’! हैराण नेटकरी म्हणतात, “…वडापावचा सत्यानाश!”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘चॉकलेट चीज वडापाव’! हैराण नेटकरी म्हणतात, “…वडापावचा सत्यानाश!”

animallover5270 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याला म्हणतात खरी मैत्री” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “टॉम अँड जेरी” तर एका युजरने लिहिलेय, “ही मैत्री नव्हे” अनेक युजर्सनी या मैत्रीला वेगवेगळी नावे दिली आहे.