देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये करोनाचा कहर पहायला मिळत आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये करोनारुग्णांची संख्या वाढत असतानाच तामिळनाडूमधील कोईम्बतूर जिल्ह्यामध्येही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता आपल्या करोनापासून वाचवण्यासाठी देवच मदतीला येऊ शकतो असं येथील स्थानिकांना वाटत असल्याने शहराच्या बाहेर चक्क करोना देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे.

नक्की पाहा >> Photos: आधी शेण, गोमूत्राचा लेप… नंतर दूध, ताकाने आंघोळ; गुजरातमधील ‘इम्यूनिटी बुस्टींग’ चर्चेत

man was stabbed to death in a fight between two groups in nagpur
नागपुरातली गुन्हेगारी थांबेना… आता दोन गटांच्या भांडणात एकाची भोसकून हत्या…
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

करोना देवीचं मंदिर हे प्लेग मरियम्मन मंदिर स्थापन करताना जो विचार करण्यात आला होता त्याच विचाराने उभारण्यात आलं आहे. दिडशे वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या वेळेस प्लेग मरियम्मन मंदिराची स्थापना करण्यात आली होती. शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केलीय. या मंदिरात करोना देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. अधीनमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवीची मूर्ती काळ्या खडकामधून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती अडीच फूट उंचीची असून मठाच्या परिसरामधील मंदिरामध्येच तिची प्रतिष्ठापना कऱण्यात आलीय. रोज येथे अनेक भक्त या करोना देवची पुजा करण्यासाठी येतात. करोनापासून मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी ४८ दिवसांच्या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> गोरखपूर मंदिरात योगी आदित्यनाथांनी केला रुद्राभिषेक; पंडित म्हणाले, ‘यामुळे करोनाचा नाश होईल’

सध्या उभारण्यात आलेल्या करोना देवीच्या मंदिरामध्ये करोनामुळे केवळ पुजारी आणि मठातील अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येतो. या देवीच्या मंदिरामध्ये मर्यादित लोकांना जाण्यास परवानगी असली तरी येथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन केलं जातं.

अशाप्रकारे यापूर्वीही येथे प्लेगच्या साथीच्या वेळेस मंदिराची स्थापना करुन त्याला प्लेग मरियम्मन मंदिर असं नाव देण्यात आलं होतं. प्लेगमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आलं आणि त्यात मरियम्मनची प्रतिमा ठेवण्यात आली होती. लोकांनी या देवाची आराधना सुरु केली आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्लेगच्या साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं येथील स्थानिकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्याचं सांगतातं.