Viral Video : कार अपघातानंतर भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे या व्हिडीओमध्ये ऋषभ पंत चिमुकल्यांबरोबर रंगीबेरंगी गोट्या खेळताना दिसत आहे. ऋषभ पंतचा हा नवा अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लहानपणी तुम्ही सुद्धा अनेकदा या रंगबेरंगी गोट्या खेळल्या असाल. या खेळात एका गोटीने दुसऱ्या गोटीवर अचूक नेम लावायचा असतो. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना ज्यांच्याबरोबर या रंगबेरंगी गोट्या तुम्ही खेळायचे ते मित्र आठवतील. सध्या ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

ऋषभ पंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येत असतो. आता ऋषभ पंत चक्क चिमुकल्यांबरोबर गोट्या खेळताना दिसला. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ऋषभ पंत रंगबेरंगी गोट्या खेळत आहे. तो एका गोटीने दुसऱ्या गोटीवर अचूक नेम लावत आहे. ऋषभचा लूक ही तितकाच हटके आहे. त्याने रंगबेरंगी टि शर्ट, पांढरी हाफ पॅन्ट, पांढरे शूज आणि पांढरी टोपी घातली आहे. व्हिडीओमध्ये त्याचा चेहरा टोपीमुळे आणि मास्कमुळे स्पष्ट दिसत नाही.

हेही वाचा : Yuzvendra Chahal : ‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना, VIDEO होतोय व्हायरल

Johns. या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ऋषभ पंत चिमुकल्यांबरोबर गोट्या खेळत आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना ऋषभचा हा नवा अंदाज आवडला आहे. काही लोकांना ऋषभला रंगबेरंगी गोट्या खेळताना पाहून त्यांच्या लहानपणीचा आठवण आली आहे. एका युजरने लिहिलेय, “मी हा खेळ खेळायचो पण कधीच जिंकायचो नाही” तर एका युजरने लिहिलेय, “अनेक आठवणी समोर आल्या. पु्न्हा हा खेळ बघताना आवडले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बालपण आठवले..” अनेकांनी ऋषभवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांना त्याचा फिट लूक आवडला आहे.

३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याच्या कारला आग लागली होती. अपघातानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता पण आता ऋषभ आयपीएलच्या माध्यमातून पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरू आहे.