आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला नाही. आपल्या समोर अशी अनेक उदाहरणे असतील जिथे पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनी यश मिळवले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात आता माहिला मागे राहिल्या नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता हेच बघा ना घरोघरी समान पोहोचते करणारे अनेक डिलिव्हिरी बॉय आहेत. जे पिझ्झापासून किराणा सामान घरो घरी पोहोचते करतात. आता या क्षेत्रात महिला उतरल्या आहे आणि याची सुरूवात केली आहे दिल्लींच्या मुलींनी.

VIDEO : १८ सिंहांच्या ‘शाही भोजना’ने रस्त्यात झाली वाहतूक कोंडी

दिल्ली ही भारताची राजधानी.. तसे इथे महिला सुरक्षित नाही असे अनेकदा बोलले जाते. अनेक सर्वेक्षणातूनही ते समोर आले आहे. महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा वेगळा आहे पण हि सारी परिस्थीती पायादळी तुडवत इथे राहणा-या काही मुलींनी धाडस करून एका नव्या क्षेत्रात उडी घेतली आहे. हे क्षेत्र आहे ते डिलिव्हरीचे. म्हणजेच घरोघरी सामान पोहोचते करण्याचे. या क्षेत्रात तरुण मुले किंवा पुरुषांची मक्तेदारी आहे. पण जर एक पुरुष घरोघरी सामान पोहोचवण्याचे काम करू शकतो तर महिला का नाही? आणि याच कल्पनेने दिल्लीतल्या २८ वर्षीय योगेश कुमारने ईवन कार्गो कंपनीची स्थापना केली. ही अशी कंपनी आहे जी फक्त मुलींनाच नोकरी देते. सध्या या कंपनीत १०० मुली सामान पोहचते करण्याचे काम करतात. या सगळ्यांना कुमार यांनी आधीच स्कूटर चालवण्याची ट्रेनिंग दिली आहे.

VIRAL VIDEO : हॉरर मूव्ही सुरु असताना टीव्हीतून बाहेर आले भूत

दिल्लीमधील गरजू मुली कुमार यांच्या कंपनीत डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचे सामान घरोघरी त्या पोहोचते करतात. यातून त्यांना चांगला पगारही मिळतो आणि घर खर्चाला त्यांच्या हातभारही लागतो.