करोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. घराबाहेर पडण्याची गरज नाही म्हणून सुरूवातीला आनंदी असणारे नागरिक आता घरात राहून कंटाळलेले दिसून येत आहेत. रस्त्यावरील माणसांची वर्दळ कमी झाली असल्याने अनेक ठिकाणी वन्य प्राणी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लॉकडाउनचा परिणाम माणसांवर होत असला तरी प्राणी आणि पक्षी मात्र स्वच्छंदपणे विहार करत आहेत. असाच एक हत्ती आणि हत्तीच्या पिल्लांचा गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘मी आता लुंगीवरच असतो’; आनंद्र महिंद्रांनी सांगितलं खास गुपित

जंगातील एका ओढ्याच्या प्रवाहाच्या पाण्यात हत्ती आणि हत्तीची पिल्ले झकासपैकी आंघोळ करतानाचा एक व्हिडीओ सध्या साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. भारतीय फॉरेस्ट सर्व्हिस अधिकारी प्रवीण कासवान यांनी १८ सेकंदाचा एक छानसा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ कर्नाटकातील कूर्ग येथील असल्याचे बोलले जात आहे.

किरण बेदींचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी दिला Whatsapp Uninstall करण्याचा सल्ला

हत्तींच्या त्या व्हिडीओमध्ये काही मोठे हत्ती इतर छोट्या हत्तींसोबत पाण्यात मनसोक्त डुंबून आंघोळीचा आनंद घेताना दिसत आहेत. “जे प्राण्यांचे (हत्तीचे) कुटुंब एकत्र पाण्यात डुंबून आंघोळीचा आनंद घेते, ते कुटुंब कायम एकत्र राहते. विशेषत: त्या हत्तीच्या पिलांची मजा तर पाहा…”, असे ट्विट या व्हिडीओचे वर्णन करताना कासवान यांनी केले आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्या-केल्या त्याला दोन तासांतच सुमारे सहा हजार व्ह्यूज मिळाले होते. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेकांच्या मोबाईलवर ते पुन्हा पुन्हा पाहिला देखील जात आहे.