लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. निवडणुकीतील विजयासाठी कुठे प्रचारसभा, रॅली, तर मोर्चेबांधणी केली जात आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्याअगोदर सोशल मीडियावर ईव्हीएम मशीनसंदर्भातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) वापराविरोधात झालेल्या निषेधाचा असल्याचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू झाल्याचा दावाही या व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे. पण, हा व्हिडीओ खरंच पंजाबमधील आहे का? यामागचे सत्य काय आहे ते जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Tanvir Rangrez ने हा व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

Lakshmir Bhandar scheme West Bengal Mamata Banerjee BJP Loksabha Election 2024
‘लक्ष्मी भंडार योजने’वरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये का जुंपली आहे?
campaign Violations, campaign Violations in Nashik, Cases Registered, Mahayuti office bearers, Mahavikas Aghadi office bearers, Lok Sabha Elections, nashik lok sabha seat,
नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर जय श्रीराम, अबकी बार ४०० पारच्या घोषणा
Electoral officials beaten up in Mulund A case has been registered against 20 25 persons Mumbai
मुलुंडमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; २० – २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
Priyanka Gandhi Congress campaign in Rae Bareli loksabha election 2024
रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?
Sanjay Raut on Ajit pawar (1)
“मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”
Solapur lok sabha, solapur, political party,
सोलापूर : कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा ? विविध समाजामध्ये विभागणी
Punjab Sikh Shiromani Akali Dal BJP interference in Sikh Farmers Protest
भाजपाने मतांसाठी शिखांच्या धार्मिक बाबींमध्ये लुडबूड करु नये; शिरोमणी अकाली दलाची टीका
BJP, Sharad Pawar group, ahmednagar,
नगरमध्ये धनगर समाजाची मते आकर्षित करण्यावर भाजप, शरद पवार गटाचा भर

या पोस्टचे अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा.

https://web.archive.org/web/20240411062035/https://twitter.com/virjust18/status/1762045842092151061

इतर वापरकर्तेदेखील अशाच दाव्याद्वारे व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid क्रोम एक्स्टेंशनमध्ये व्हिडीओ अपलोड करून, आमचा तपास सुरू केला. यावेळी आम्ही व्हिडीओमधून अनेक स्क्रीनशॉट मिळवले.

यावेळी ‘rudra_khosh’ या इन्स्टाग्राम हॅण्डलवर शेअर केलेल्या एका रीलमध्ये आम्हाला व्हायरल व्हिडीओमधील व्हिज्युअल सापडले.

व्हिडीओवरील मजकुरावरून हा व्हिडीओ हिमाचलमधील ‘गवास शांत महायज्ञ’ कार्यक्रमाचा असल्याचे सूचित करतो. .

आम्हाला YouTube शॉर्ट्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही व्हायरल व्हिडीओतील व्हिज्युअल सापडले.

दोन्ही रीलमध्ये लोकेशन ‘गवास’ असे टॅग केले होते.

त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड सर्च केले आणि या महायज्ञाबद्दल बातम्या शोधून काढण्यास सुरुवात केली.

https://www.amarujala.com/shimla/after-38-years-a-shant-mahayagya-performed-in-gavas-village-rohru-in-the-presence-of-gods-goddesses-and-thous-2024-01-08

हिमाचल प्रदेशातील गवास गावात ३८ वर्षांनंतर शांत महायज्ञ झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

यूट्युबवरील विविध चॅनेल्सवर आम्हाला महायज्ञाचे अनेक व्हिडीओही पाहायला मिळाले.

निष्कर्ष

हिमाचल प्रदेशातील रोहरू येथील गवास गावात ३८ वर्षांनंतर आयोजिलेल्या शांत महायज्ञाचा व्हिडीओ पंजाबमध्ये ईव्हीएमविरोधात काढलेल्या निषेध मोर्चाचा असल्याचे सांगून शेअर करण्यात येत आहे. परंतु, हा व्हायरल दावा खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे.