पाणीपुरी कोणाला खायला आवडतं नाही….लहानापासून मोठ्यंपर्यंत प्रत्येकाला पाणीपुरी खायला आवडते…प्रत्येक जण आवडीने पाणीपुरी खातात….काही लोक पाणीपुरी साठी इतके वेडे असतात की रोज पाणीपुरी खाऊ शकतात. सध्या अशाच एका पाणीपुरी आवडणाऱ्या मुलींचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या मुलीची पणीपुरीवरील प्रेम पाहून तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी खास भेट दिली आहे जी पाहून ती थक्क झाली आहे. या तरुणीला तिच्या घरच्यांनी चक्क पाणीपुरी बुके गिफ्ट केला आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात फुलांचा बुके नाही पाणीपुरी बुके.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असे आतापर्यंत फुलाच बुके ऐकलं होते आता हे पाणीपुरी बुके काय नवीन प्रकार आहे. चला तर मग जाणून घेऊ या…

फुलाच्या बुकेसारखा दिसणार हा पाणीपुरी बुके मध्ये काही पुऱ्या, गोड चिंचेचे पाणी, तिखट पाणी, रगडा हे सर्व गोष्टी दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे या पाणीपुरी बुकेला फुलांच्या बूकेसारखा आकार दिला आहे. बुके पकडता येईल अशी सोय केली आहे. जसे बुकमध्ये फुल दिसतात त्याप्रमाणे कागदाचा वापर करून पुऱ्या ठेवल्या आहेत. तर बुकेच्या मध्यभागी प्लास्टिक पिशवीमध्ये चटणी आणि रगडा पॅक केलेला दिसत आहे. त्यावर शो साठी काही नाजूक फुले ठेवली आहे.

हेही वाचा –केदारनाथला निघालेले हजारो यात्रेकरू सीतापूरजवळ अडकले, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ riyajain या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तरुणीने सांगितले आहे की कशाप्रकारे तिच्या घरच्यांनी तिला पाणीपुरी बुके भेट देऊन सरप्राइज केले. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, माझे पाणीपुरीचे वेड आणखी एका पातळीवर पोहचले आहे, म्हणून काही महिन्यांपूर्वी माझ्या वाढदिवसानिमित्त, माझ्या आई आणि कुटुंबीयांनी मला एक अनोखी आणि आश्चर्यकारक भेट देऊन आश्चर्यचकित केले: एक पाणीपुरी बुके

मी यापूर्वी असे काहीही पाहिले नाही! त्यांच्या सर्जनशीलतेने (क्रिएटिव्हिटी) आणि विचारशीलतेने मला थक्क केले आहे. बऱ्याच लोकांनी मला याबद्दल विचारले आहे आणि मला फक्त हा खास भेट सर्वांसोबत शेअर करायचा होता.”

हेही वाचा – परदेशी व्लॉगरला आवडली दिल्लीची मेट्रो, म्हणे, ‘सर्वात भारी मेट्रो!, पाहा Viral Video

पाणीपुरी बुके ही कल्पना अनेकांना आवडली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. काही लोक मला पाणीपुरी बुके गिफ्ट करा अशी इच्छा व्यक्त करत आहे तर काहींनी हा बुके कसा तयार केला किंवा कुठे खरेदी करता येईल याची विचारणा केली.

तुम्हाला ही कल्पना कशी वाटली?