उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असताना, सीतापूर परिसरातील गोंधळाच्या स्थितीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहे. गर्दी पाहता चार धाम यात्रेसाठी ऑफलाइन नोंदणी ३१ मे पर्यंत थांबवण्यात आली आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सीतापूर परिसरात एक हजाराहून अधिक यात्रेकरू मोठ्या वाहतुक कोडींत अडकले आहेत, त्यापैकी बहुतेक पायी जाणारे प्रवासी आहेत.

व्हिडिओमध्ये एका अरुंद गल्लीत व्हॅन अडकल्याचे दिसत आहे. एक माणूस असे म्हणताना ऐकू येतो, “जर तुम्हाला केदारनाथला यायचे असेल तर कृपया हा व्हिडिओ पहा. हे फक्त सीतापूर आहे, जे केदारनाथपासून ४० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी गर्दी आहे आणि गर्दी कमी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.”

व्हिडिओ शेअर करताना, X हँडल @IndianTechGuide ने लिहिले, “केदारनाथमधील परिस्थिती चांगली नाही. सुरक्षित रहा आणि त्यानुसार फिरण्याची योजना प्लॅन करा.

हेही वाचा –‘कोणालाही नियमाची पर्वा नाही’, ब्रह्मपुत्रा एक्स्प्रेसमध्ये तिकिट नसलेल्यांची गर्दी, नाराज प्रवाशांनी शेअर केला Video

हेही वाचा – परदेशी व्लॉगरला आवडली दिल्लीची मेट्रो, म्हणे, ‘सर्वात भारी मेट्रो!, पाहा Viral Video

व्हिडिओला २,६९,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिले की, “एक शोकांतिका घडण्याची वाट पाहत आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “अशा ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा निश्चित करण्याची वेळ आली आहे, अन्यथा आपत्ती येऊ शकते.”

“ही स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार योजना आखा आणि केदारनाथमध्ये सुरक्षित राहा कारण गोष्टी ठीक होत नाहीत,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

उत्तराखंड सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, २६ मे ते ६ जून या कालावधीत अनुक्रमे बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन यात्रा दंडाधिकारी – अशोक कुमार पांडे आणि पंकज कुमार उपाध्याय – तैनात करण्यात आले आहेत, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.