एअर इंडियाने शुक्रवारी आपला नवीन इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ ‘सेफ्टी मुद्रा’ लॉन्च केला. यात भारतातील विविध शास्त्रीय आणि लोकनृत्यांमधून भारताच्या समृद्ध संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. या लोकनृत्यांमधून विमानाच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेशी निगडीत गोष्टीही समजावून सांगण्यात आल्या आहेत. एअरलाइन्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, कथ्थक, घूमर, बिहू आणि गिद्धा यांसारखी अनेक लोकनृत्ये दाखवण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये दाखविलेल्या प्रत्येक लोकनृत्याच्या ‘मुद्रां’मार्फत सुरक्ष नियमांबाबत माहिती देण्यात आले आहे. व्हिडिओमधील प्रत्येक नृत्य प्रकार आकर्षक आणि सांस्कृतिक पद्धतीने सादर केलेल्या विशिष्ट सुरक्षा सूचना सांगत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in