कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध राज्यांतील पोलीस विभाग अनेकदा सोशल मीडियाचा वापर करून लोकांना गुन्हे आणि अपघातांबाबत सतर्क करतात. त्यात दिल्ली पोलिस सातत्याने येथील नागरिकांमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंग कसे करावे याविषयी जगजागृती करत असतात. त्यासाठी ते अनेकदा नवनव्या आयडिया वापरत असल्याचे दिसते. अशाच प्रकारे दिल्ली पोलिसांनी पुन्हा युनिक स्टाईलने चालकांना वाहन चालविताना सावधता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे नवीन होर्डिंग्ज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत; ज्यामध्ये रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या चालकांना अनोख्या शैलीत जागरूक केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या रोड सेफ्टी अॅडव्हायजरीमध्ये दिल्ली पोलिसांनी नागरिकांना खाण्याच्या क्रेव्हिंगऐवजी गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी अतिशय क्रिएटिव्ह पद्धत वापरली आहे. दिल्ली पोलिसांच्या या पोस्टमध्ये लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगबद्दल शिक्षित करण्यासाठी डिझाइन केलेल्या तीन क्रिएटिव्ह होर्डिंग्स दिसत आहेत.

पहिले होर्डिंग स्विगी जाहिरातीचे आहे; ज्यात चालकांना त्यांची खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूपची बाउल ऑर्डर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या होर्डिंगमध्येही एक जाहिरात आहे; ज्यामध्ये ‘किलर सूप’ नावाची नेटफ्लिक्स मालिका पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच्या समोरच दिल्ली पोलिसांनी त्याचे होर्डिंग लावले आहे; ज्यावर लिहिले आहे, हॉस्पिटल सूपचे क्रेविंग होतेय. आशा आहे की, तसे होणार नाही. त्यामुळे सुरक्षितपणे वाहन चालवा.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ही पोस्ट करीत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘क्रेविंगवर नाही, तर ड्रायव्हिंगवर लक्ष द्या’. ही पोस्ट व्हायरल होत आहे आणि लोक दिल्ली पोलिसांच्या या क्रिएटिव्ह एॅडव्हायजरीवर कमेंट करीत आहेत. अनेकांना दिल्ली पोलिसांचे हे ट्वीट फार आवडले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Focus on driving not on craving delhi police cautions people for road safety in funny way sjr
First published on: 01-02-2024 at 14:27 IST