Google Doodle Pani Puri : पाणीपुरीचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी भारतातील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे जे प्रत्येक शहरात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कुठे गोलगप्पे, कुठे पुचका, कुठे गुपचुपी, कुठे पानी के पताशे अशा विविध नावांनी पाणीपुरी ओळखली जाते. तळलेल्या पुरी थंड, टेस्टी चटणी आणि पाण्यासह सर्व्ह केल्या जातात. तुम्ही म्हणत असाल आम्ही पाणीपुरीबद्दल का सांगत आहोत तर पाणीपुरीची चर्चा आज गुगलने सुरु केली आहे. खरं तर गुगलने आज पाणीपुरीवर डुडल तयार केले आहे. या डुडल द्वारे गुगलने सर्वांना एक मजेशीर गेम खेळण्याची संधी दिली आहे.

गुगलने तयार केलं पाणीपुरी डुडल आणि गेम

पाणीपुरीबाबत माहिती सांगताना गुगलने विविध फ्लेवरच्या पाण्याने भरलेल्या पुरीमध्ये बटाटा, छोले, मसाले आणि मिर्चीने भरलेला असतो. याशिवाय गुगलने पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळे फ्लेवरच्या पाण्याची माहिती दिली आहे.

Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

हेही वाचा – आता बातम्या सांगणार AI न्युज अँकर! ओडीसाच्या खासगी चॅनलने लॉन्च केली व्हर्च्युअल अँकर ‘लिसा’; पाहा व्हिडीओ

पाणीपुरीचा विश्वविक्रम कोणत्या रेस्टॉरंटच्या नावावर आहे

गुगलने गोलगप्पा म्हणजेच पाणीपुरीच्या विश्वविक्रमाचीही माहिती दिली आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये, मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटच्या नावे पाणीपुरीच्या वेगवेगळ्या चवीच्या पाण्याचा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. पाणीपुरी सर्व्ह करताना, इंदूरमधील रेस्टॉरंटने विविध फ्लेवरच्या पाण्याचे ५१ पर्याय ठेवले होते.

हेही वाचा – हवेत उडणाऱ्या कारचा व्हिडीओ पाहिला का? ‘या’ कंपनीने तयार केली Electric Flying Car

गुगल डुडलवर पाणीपुरी गेम कसा खेळावा?

जर तुम्हाला गुगल डुडलवर पाणीपुरी गेम खेळायचा असेल तर त्यासाठी टाईमरसाठी पटापट तुम्हाला स्क्रिनवर दिलेल्या फ्लेवरची पाणीपुरी निवडावी लागेल. यामध्ये चिंचेची पाणीपुरी , हिरव्या चटणीची पाणीपुरी आणि दहीपुरी अशा तीन प्रकारच्या पाणीपुरी दिसत आहे. वेगवेगळ्या ग्राहकांची आवड लक्षात घेऊन पाणीपुरी सर्व्ह करावी लागेल. तुम्ही कँडी क्रश खेळला असाल तर हा गेम तुम्हाला खेळता येईल फक्त ट्विस्ट असा आहे की कोणती पाणीपुरी आणि किती पाणी पुरी निवडायाच्या हे तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. त्याप्रमाणेच तुम्हाला पाणीपुरी निवडावी लागेल म्हणजे तुम्ही तुमचा स्कोअर वाढवू शकता. गेम अतिशय मजेशीर असून तुम्हाला नक्की आवडेल.