Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जणांचे डान्स करतानाचे व्हिडीओ नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या असाच मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा त्याच्या आजीबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्याचा आणि आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

.या व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या आजीबरोबर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तो आजीबरोबर कपल डान्स करताना दिसतोय. नऊवारी नेसलेली आजी सुद्धा नातवाबरोबर डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून तुम्हीही भावनिक व्हाल. आजीला हा कपल डान्स येत नाही पण नातवाच्या आनंदासाठी ती हा डान्स करते आणि नातूसुद्धा तिला डान्स शिकवताना दिसतो. आजी नातवाची ही जोडी पाहून अनेकांना त्यांच्या आजीबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवेल.

प्रत्येकाच्या आयुष्यात आजी आजोबाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजी आजोबा नातवंडांचे खूप जवळचे मित्र असतात. यांच्यातील मैत्री ही जगावेगळी असते. आजी आजोबांचे त्यांच्या नातवंडांवर खूप प्रेम असते. त्यांच्याबरोबर ते सुद्धा लहान होतात. या व्हिडीओ सुद्धा तुम्हाला आजीचे या नातवावर किती प्रेम आहे, हे दिसून येईल. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “आजी नातूचं प्रेम”

हेही वाचा : Pune : पुणे तिथे काय उणे! पुणेरी काकांनी हद्दच केली राव! बस आली तर रस्त्याच्या मधोमध, व्हिडीओ व्हायरल

its_prit24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर तुम्हाला तुमच्या आजीची आठवण येत असेल तर शेअर करा. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नशीब लागतं मित्रा अशी अॅक्टिव्ह आजी असायला” तर एका युजरने लिहिलेय, “भावा.. मी तुझ्यासारखा माझ्या आजीबरोबर नाचायला गेलो आणि आजीने हरीपाठ चालू केला” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुख म्हणजे आजीचे प्रेम असते” अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आजीची आठवण आली आहे तर काही युजर्सनी आजीबरोबरच्या आठवणी शेअर केल्या आहेत. काही युजर्सनी तर व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandma and grandchild couple dance video a young boy dance with his grandmother video goes viral on social media ndj
First published on: 02-02-2024 at 10:11 IST