RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसह ते प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ शेअर करतात. मंगळवारी त्यांनी एक्सवर एक नवा व्हिडीओ शेअर कले आहे. व्हिडीओमध्ये चीनमध्ये पेमेंट करण्याची नवी पद्धत पाहायला मिळत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये पेमेंट करण्यासाठी आता तळहाताचा वापर केला जात आहे. चीनमध्ये ‘पाम पेमेंट’ अशी नवीन पद्धत सुरु झाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांसह हर्ष गोएंका देखील आश्चर्य चकीत झाले आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी तंत्रज्ञान आपले जीवन कसे सुलभ करत आहे हे सांगितले आहे.

ह र्ष गोयंकानी शेअर कलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला बीजिंग सबवेवर तंत्रज्ञान वापरण्याचा तिचा अनुभव शेअर करताना दिसत आहे. महिला व्हिडीओमध्ये सांगते की, चीनमध्ये राहून, मला QR कोड स्कॅन आणि फेस स्कॅन या तंत्रज्ञानाचा वापर करून कॅशलेस पेमेंट करण्याची सवय आहे आणि आता मी माझ्या थेट हातांनी पेमेंट करू शकते. २१ मे रोजी, चिनी टेक दिग्गज Tencent ने अधिकृतपणे त्यांचे WeChat palm payment वैशिष्ट्य जाहीर केले आहे. मी डॅक्सिंग एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर या सबवे राईडवर हे पेमेंट करण्याचा प्रयत्न करते आहे,”

BSNL unveils 365 day plan
वर्क फ्रॉम होम करताय? तुमच्यासाठी BSNL चा ‘हा’ रिचार्ज ठरेल बेस्ट? किंमत किती ? जाणून घ्या
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
5 settings on your iPhone to take your photos cool
क्रिएटिव्ह फोटो काढायचे आहेत? मग तुमच्या iPhone मधील आजच बदला ‘या’ पाच सेटिंग्स…
Sudha murty explain after getting troll
Sudha Murty Troll : रक्षाबंधनाच्या कथेवरून सुधा मूर्ती ट्रोल, नेटिझन्सना उत्तर देत म्हणाल्या, “माझा उद्देश…”
Loksatta kutuhal Kevin Warwick British Cybernetics researcher Vice Chancellor of Coventry University
कुतूहल: केविन वॉरविक
RBI announced two significant changes to UPI system
आता UPI द्वारे भरता येणार ‘एवढ्या’ रुपयांपर्यंत कर; तर मुलं, आजी-आजोबांसाठी येणार ‘हे’ खास फीचर; जाणून घ्या नेमके काय झालेत बदल
rishabh pant offer post
Rishabh Pant : “जो सर्वाधिक लाईक आणि कमेंट करेल त्याला माझ्याकडून…”, ऋषभ पंतची नीरज चोप्रासाठी पोस्ट; नेटिझन्सला दिली ‘ही’ ऑफर!
loksatta kutuhal robots in the manufacturing industry
कुतूहल : औद्योगिक यंत्रमानव

त्यानंतर ती महिला ‘पाम पेमेंट’ तंत्रज्ञान कसे कार्य करते हे स्पष्ट करते. एका डिजीटल उपकरणावर तीच्या तळहात स्कॅन करून पेंमेंट महितीसह जोडते. त्यासाठी तिने उपकरणावर हिरवी रिंग असलेल्या टर्नस्टाइलवर स्कॅनरवर तिचा तळहात धरला आहे, जो तिच्या WeChat खात्याद्वारे स्वयंचलित पेमेंटवर( automatic payment) प्रक्रिया करतो.

“संपूर्ण पाम पेमेंट प्रक्रियेचा हा अनुभव अत्यंत सहज पार पडतो जरी पाम पेमेंट काही काळासाठी वाहतुकीपुरते मर्यादित असले तरी भविष्यात ते स्टोअर्स, रेस्टॉरंट्स आणि इतर अनेक ठिकाणी स्वीकारले जाऊ शकते,” असे ती महिला तिचा अनुभव सांगताना स्पष्ट करते.

व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी लिहिले की, “तंत्रज्ञान आपले जीवन सोपे करत आहे…”

हेही वाचा – गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

येथे पाहा व्हिडीओ:

व्हिडिओला २७,००० पेक्षा जास्त वेळा पाहिले आहे. सोशल मीडियाच्या नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. . “हे उत्तम आहे सर मात्र, डेटाची देवाणघेवाण करणे धोकादायक असेल,” असे एकाने सांगितले तर दुसरा म्हणाला, “जर एखाद्यावेळी आपण झोपलो असेल तर अशावेळीतळहात कुठे लपवायचे? कोणीतरी मोबाईल रीडर आणू शकतो आणि शक्य तितकेवेळा तळहात आनंदाने स्कॅन करू शकतो?

हेही वाचा –बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

गेल्या वर्षी, ऍमेझॉनने ऍमेझॉन वन एंटरप्राइझ, कॉर्पोरेट ऑफिससाठी डिझाइन केलेले पाम-रीडिंग बायोमेट्रिक प्रणालीची आवृत्ती आणली होती.