Premium

कशी केली जाते रेल्वेच्या डब्यांची सफाई? मध्य रेल्वेने पोस्ट केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल

एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रेल्वेची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते हे दिसते आहे.

How are railway coaches cleaned
रेल्वेची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते, पाहा व्हिडीओ (फोटो सौजन्य @Central_Railway)

रेल्वे ही भारतीयांसाठी अत्यंत सोयीस्कर आणि खिशाला परवडणारा असा वाहतूकीचा पर्याय आहे. देशभरात कुठेही जाण्यासाठी सर्वसामांन्याच्या खिशाला परवडणारा पर्याय म्हणजे रेल्वे. पण अनेकदा रेल्वे प्रवासात अस्वच्छता असेल तर प्रवाशांना त्याचा त्रास होतो. काही दिवांपूर्वीच एका रेल्वेच्या डब्यातील कचरा रुळावर फेकला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रेल्वेची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते हे दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ एक्स (ट्विटर) @Central_Railwayवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की”मुंबई विभागातील वाडीबंदर यार्ड येथील एक मेल एक्स्प्रेस रेकच्या दैनंदिन नियमित साफसफाईच्या कामाचे सामान्य दृश्य” व्हिडीओमध्ये दिसते आहे की, रेल्वेच्या स्वच्छता विभागाचे युनिफार्म परिधान केलेल काही कर्मचारी एका एक्सप्रेस मेलची स्वच्छता करत आहे. कोणी पाईपने पाणी मारताना दिसत आहे तर कोणी दार किंवा खिडक्या पुसताना दिसत आहे. कोणी रेल्वेच्या डब्बा साफ करताना दिसत आहे. रेल्वेच्या डब्यातील प्रत्येक सीट पुसून घेतले जात आहे. बेसिन आणि नळाची सुद्धा सफाई केली जात असल्याचे दिसते. रेल्वेतील कचरा एका हिरव्या पिशवीत बांधून वेगळा केला जात आहे.ॉ

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! मांसाहारी आणि शाकाहारी थाळीच्या किंमतीत


हेही वाचा – दिलदारपणा असावा तर असा! रस्त्यावर कार साफ करणाऱ्या मुलांना व्यक्तीने फाइव्ह स्टार हॉटलेमध्ये दिली ट्रिट, Video Viral

व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांनी रेल्वेच्या कामाकाजाचे कौतूक केले आणि काहींनी सुरक्षेविषयी चिंता व्यक्ती केली. एकाने लिहिले की, “सेफ्टी शूज नाही, हातमोजे नाही, मास्क नाही, एकूण सुरक्षा शून्य! तर दुसरा म्हणाला, ह्याचा उपयोग काय? जर कोच अटेंडंट स्वतः गुटखा खातो आणि बेसिनमध्ये किंवा डब्यांमध्ये थुंकत असेल तर 12172 च्या 1st AC मधील माझ्या अलीकडच्या प्रवासात मी याचा अनुभव घेतला आहे. असे व्हिडिओ पोस्ट करण्याऐवजी तुमच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता राखण्यास शिकवा.” तिसरा म्हणाला, “LHB गाड्या सहसा स्वच्छ असतात, पण ICF तितक्या चांगल्या नसतात. बर्‍याच वेळा, ICF बोगीच्या खिडक्या इतक्या खराब असतात की तुम्हाला बाहेरचे दिसणे कमी असते”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How are railway coaches cleaned the video posted by central railway is going viral snk

First published on: 08-12-2023 at 17:03 IST
Next Story
Viral Video: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात