कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड /पीएफ म्हणजे आयुष्यभराची जमापुंजी असते. निवृत्त झाल्यानंतर हा पीएफ प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामी येतो. पण आपल्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती मात्र आपल्याला नसते. पण आता ही माहिती मिळवणं अधिक सुलभ होणार आहे. ‘मिस्ड कॉल’ किंवा मेसेज करून घरबसल्या तुम्ही ती रक्कम जाणून घेऊ शकता.

Video : चोरीसाठी काहीपण, चोरट्याची करामत बघून तुम्ही व्हाल थक्क

मिस्ड कॉल देऊन
तुमच्या पीएफ अकाऊंटशी जोडल्या गेलेल्या मोबाईलवरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाईलवर जमा रक्कम सांगणारा एक मेसेज येईल.

एसएमएसच्या मदतीने
या व्यतिरिक्त तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून देखील माहिती मिळवू शकता. ०७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस केल्यानंतर तुम्ही रक्कम जाणून घेऊ शकता. ज्यांनी यूएएन सेवा सुरू केली आहे असेच कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. ‘EPFOHO UAN’ असे टाईप करून तुम्हाला ज्या भाषेत माहिती हवी आहे त्या भाषेतील पहिली तीन अक्षरे टाईप केल्यानंतर ही माहिती मिळेल. उदा- ‘EPFOHO UAN MAR’ किंवा ‘EPFOHO UAN ENG ‘ टाईप करून मराठी किंवा इंग्रजीमध्ये माहिती मिळवू शकता.

Viral : फेसबुकवर चुकूनही ‘कमल का फूल हमारी भूल’ टाईप करू नका, अन्यथा…