आजच्या काळात सॉफ्टवेअर इंजिनिअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना भरपूर पगार मिळतो. म्हणूच याला व्हाइट कॉलर जॉब म्हणून पाहिले जाते. इंटरनेटच्या काळात ही नोकरी करणे सहज शक्य आहे. लोकांनी कोणत्याही ठिकाणी राहून हे काम करू शकतात. या जॉब वरुन सोशल मीडियावर एक नवा वाद पेटला आहे कारण एका व्यक्तीने सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून लेहेंगा विकण्याचा सल्ला दिला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांच्या विविध प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या चांदणी चौक मार्केटमध्ये ब्राईडल फॅशन उद्योगाने अनेक वर्षांपासून केंद्रस्थान म्हणून ओळखले जाते. येथील अरुंद गल्ल्या लोकप्रिय डिझायनर्सच्या स्टुडिओपेक्षा काही कमी नाहीत कारण तेथे जवळजवळ कोणत्याही प्रकारचे स्वस्त डुब्लिकेट लेंहेगे मिळतात. खरे तर सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. अशा परिस्थितीत लोक कपड्यांची खरेदी करण्यासाठी येथे येतात. महिलांना चौंदणी चौकात जाणे खूप आवडते. येथे आल्यानंतर येथील जगमगत्या जगाची प्रत्येकाला भुरळ पडते. असेच काहीसे चांदणी चौकमध्ये खरेदीसाठी आलेल्या एका व्यक्तीच्याबाबतीही घडले आणि या व्यक्तीच्या मनात लेहेंगा विकण्याचा व्यवसाय करावा अशी इच्छा निर्माण झाली. एवढंच नाही तर त्याने सोशल मीडियावर जाऊन इतरांना असे करण्याचा सल्ला दिला आहे.

अमित जगलानच्या नावाच्या एक्स( ट्विटर) अकांउटवर ही पोस्ट शेअर केली आहे. चांदणी चौकात दोन तास भेट दिल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की इथे लेहंग्याच्या किंमती १ लाखाहून जास्त आहे. त्यानंतर निरिक्षणावरून अमितने लिहिले आहे, “सॉफ्टवेअर कंपनी जॉब सोडा चांदणी चौकात लेहेंगा विका” ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्य आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले.

हेही वाचा – GPay वापरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागणार पैसे? कोणतेही शुल्क न भरता कसा करावा रिचार्ज, जाणून घ्या खास ट्रिक

काहींनी सॉफ्टवेअरचे काम अवघड आहे असे म्हटले तर काहींनी लेहेंगा विकण्याचे काम अवघड आहे असे म्हटले. काही चांदणी चौकातील व्यवसायांची तुलना केली आणि तेथे मालमत्तेसाठी लागणारे भांडवल मिळवण्याच्या आव्हानांविरुद्ध काहींनी वाद घातला.

हेही वाचा – ५२ वर्ष सुखी संसाराची! शिमलामधील ‘हे’ वृद्ध जोडपं जिंकतंय नेटकऱ्यांचं मन; Video व्हायरल

या पोस्टला १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. एका यूजरने या पोस्टवर लिहिले आहे- “लेहेंगा विकणे हे अवघड काम आहे.” दुसर्‍याने लिहिले – प्रामाणिकपणे, सॉफ्टवेअरचे काम उत्कृष्ट आहे. लेहेंग्याचे काम खूप अवघड आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leave job sell lehengas at chandni chowk man suggestion internet divided snk