Train Running In Foggy Condition : थंडी आणि धुक्यामुळे देशभरात वाहनांचा वेग मंदावला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश भागात थंडीची लाट पसरली आहे. दाट धुक्यामुळे रस्त्यांवर शांतता आहे. सकाळच्या वेळी मोजकीच वाहने संथगतीने जाताना दिसतात. थंडीचा परिणाम ट्रेनवरही झाल्याचे दिसून येत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा ट्रेन उशीर सोडल्या जात असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. खरं तर, हिवाळ्यात धुक्यामुळे ट्रेनला उशीर होतो. दाट धुक्यात ट्रेन चालवणे किती आव्हानात्मक आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. धुक्यामुळे अनेक वेळा लोको पायलट किंवा ट्रेन चालकांना ट्रॅकही दिसत नाही आणि अशा परिस्थितीतही ते जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक ट्रेन दाट धुक्यातून जाताना दिसत आहे.

धुक्यात ट्रेन वेगाने धावताना दिसते (How loco pilot run train in fog)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दाट धुके पसरलेले आहे. दाट धुक्यामध्ये ट्रेन पुढे जात आहे. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, ते इंजिनच्या आतून शुट केला गेला आहे. व्हिडीओ पाहून हे समजू शकते की लोको पायलटसाठी ट्रेन चालवणे किती कठीण काम आहे. व्हिडिओमध्ये इंजिनमध्ये अनेक प्रकारची बटणे दिसत आहेत. दरम्यान, रेल्वे रुळावर अतिशय वेगाने धावत आहे. धुक्यात विजेचे खांबही दिसत आहेत. दाट धुक्यामुळे रेल्वे ट्रॅकही नीट दिसत नाहीये तरी जीव मुठीत घेऊ लोको पायलट ट्रेन चालवत आहे.

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हेही वाचा – जुगाड असावा तर असा! ‘या’ चुलीवर गिझरपेक्षाही झटपट गरम होते पाणी; Viral Video एकदा बघाच

हेही वाचा – Video : रोज घर झाडल्यानंतर झाडूमधून फक्त सेफ्टी पिन फिरवा; मोठ्या समस्येतून होईल सुटका!

व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा (Train running in fog video)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @assistant_loco_pilot400 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत, तर १ लाख ४६ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, “भारतीय रेल्वेला सलाम” दुसऱ्या युजरने लिहिले, “याला म्हणतात डोळे बंद करून विश्वास ठेवणे.” तिसर्‍या युजरने लिहिले की, “या वेगाने सिग्नल कसा ओळखला जाईल.”