अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. पण एखाद्या गोष्टीकडे व्यक्ती कशापद्धतीने पाहतात त्यावरुन त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज बांधता येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. आधी हा फोटो काय आहे ते पाहूयात आणि त्यामधून आकलनानुसार व्यक्तीमत्वाबद्दल काय अंदाज बांधला जातो ते जाणून घेऊयात.

माइंड जर्नल नावाच्या एका वेबसाईटवरील एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोमध्ये नेमकं तुम्हाला काय दिसतंय. म्हणजे हा फोटो पाहिल्या क्षणी तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं? म्हणजे फोटोतील रेषांमध्ये तुम्हाला मानवी चेहरा म्हणजेच पुरुषाचा चेहरा दिसतोय की एक स्त्री दिसतेय? आता यातून तुम्हाला नेमकं काय दिसलंय यावरुन तुमच्या नेतृत्व गुणांबद्दल अंदाज बांधता येतोय असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण हे खरंय.

Loksatta viva Cannes International Film Festival for Indians important
कानच्या निमित्ताने..
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Pragya Misra First Employee Hired In OpenAI India Team
पॉडकास्टर, गोल्फर अन् भारतातील OpenAI मध्ये निवड झालेली पहिली व्यक्ती! जाणून घ्या कोण आहेत प्रज्ञा मिश्रा?
artificial intelligence in libraries artificial intelligence role in libraries
कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – वास्तवदर्शी अनुभव
hardik pandya natasha divorce old video viral amid rumours taking 70 percent wealth hardik pandya says his house car are in his moms name
“गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”
novels, graphic novels,
नवा दृश्यसंसार… ग्राफिक नॉव्हेलच्या जगात…
comics is Pictorial visual and cultural spaces
चित्रसंस्कार, दृश्यश्रीमंती आणि सांस्कृतिक अवकाश
Cheetah attack deer viral video
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ चित्ता आणि हरणामध्ये झटापट; हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा

खरं तर या फोटोमध्ये वर वर पाहिलं तर विशेष असं काहीच नाहीय. म्हणजेच काळा आणि पिवळा अशा दोनच रंगांचा वापर करुन काही रेषांच्या आधारे काढण्यात आलेलं हे चित्र जे लाइन्स या चित्रकाराने काढलं आहे. या चित्रात दोन गोष्टी आहेत. काहींना या फोटोत बसलेल्या महिलेची आकृती दिसते तर काहींना पुरुषाचा चेहरा. पण बारीक निरखून पाहिल्यावर नाही हा पहिल्यांदा काय दिसलं यावर पाहणाऱ्या व्यक्तींबद्दल लगेच काही अंदाज बांधता येतात असं माइंड जर्नलचं म्हणणं आहे.

आता यातून काय अर्थबोध होतो ते पाहूयात. आधी महिलेची आकृती दिसणाऱ्या व्यक्ती या फार उदार आहेत. मनमोकळ्या स्वभावाच्या अशा व्यक्ती असतात. या व्यक्तींच्या आजूबाजूचे लोक कायम त्यांचं कौतुक करत असतात. या व्यक्तींकडे एक कुशल व्यक्तीमत्व म्हणून पाहिलं जातं. अशा व्यक्तींकडून त्याच्यासोबतच्या व्यक्तींना प्रेरणा मिळते. अशा व्यक्ती सोपवलेलं काम योग्य प्रकारे पार पडतात असं सांगितलं जातं.

मात्र या फोटोत आधी पुरुषाचा चेहरा दिसणाऱ्या व्यक्ती या भावनिक दृष्ट्या थोड्या इन्ट्रोव्हर्ट म्हणजेच लवकर कोणाजवळही व्यक्त न होणाऱ्या असतात. अशा व्यक्ती आपल्या भावना लवकर व्यक्त करत नाहीत. मात्र त्यावेळी या व्यक्तींबद्दलची सकारात्मक बाब म्हणजे त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती कायमच उत्साही असतात. या व्यक्तींना आव्हानं आवडतात. त्यामुळेच ते साध्या, सोप्या, सरळ गोष्टींऐवजी आव्हानात्मक गोष्टींना प्राधान्य देतात. सकारात्मक व्यक्तींचा सहवास या व्यक्तींना हवहवासा वाटतो.