Mizoram CM Daughter Slapped Doctor: सत्तेची गुर्मी एकदा अंगात चढली की त्यातून बाहेर पडणे फारच अवघड ठरू शकते. एकदा का डोक्यात सत्तेचा गुर्मी चढली की त्यांची वाटचाल विनाशाकडे होऊ लागते. अशी अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. असंच आणखी एक नवं प्रकरण सध्या सोशल मीडियावर गाजतंय. नियम पाळणं तर सोडाच…. डॉक्टरांसोबतही आरेरावी करत त्यांना कानशिलात मारणाऱ्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत असणारी मुलगी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अपॉइंटमेंट घेण्यासाठी कसा सांगू शकतो, असं म्हणत डॉक्टरांना दमात घेत असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा हा प्रताप व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला असून तो प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.

हा व्हिडीओ मिझोरममधील आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांची ही मुलगी असून राजधानी ऐझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे सल्लामसलत करण्यासाठी गेली होती. पण यासाठी तिने अपॉइंटमेंट घेतली नव्हती. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये सल्लामसलत करण्यासाठी येण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले होते. यावरून मुख्यमंत्र्याच्या मुलीचा पारा इतका चढला की तिने क्लिनीकमध्ये डॉक्टरांसोबत हुज्जत घातली. मुख्यमंत्र्यांच्या मुलीला कोणी भेटण्याची वेळ कशी काय सांगू शकतं? असं म्हणत तिने क्लिनीकमध्ये गोंधळ घातला. यावेळी तिचा आक्रोश इतका वाढला की रागाच्या भरात ती थेट क्लिनिकमध्ये गेली आणि डॉक्टरांच्या कानशिलात मारली.

आणखी वाचा : कुत्रा स्वतःलाच घाबरून पळताना पायऱ्यांवरून धरपडला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरणार नाही!

ही घटना बुधवारी १७ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागलाय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी दारातून डॉक्टरकडे जाताना दिसत आहे. डॉक्टरांच्या खोलीत प्रवेश करताच ती त्याच्या कानशिलात मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक माणूस हस्तक्षेप करून तिचा हात धरतो. तोच माणूस तिचा हात धरून मुख्यमंत्र्यांच्या मुलीला दाराबाहेर पायऱ्यांकडे घेऊन जातो, त्यानंतर ती ओरडून पायऱ्यांवरून खाली जाते.

आणखी वाचा : ‘आ भैंस मुझे मार..’! म्हशीसमोर मुलगी नाचू लागली, मग पुढे काय घडतं ते पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं

वडील मुख्यमंत्र्यांना मागावी लागली माफी
घटनेच्या तीन दिवसांनंतर, सीएम झोरामथांगा यांनी शनिवारी २० ऑगस्ट रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सार्वजनिक माफीनामा पत्र पोस्ट केले. माफीनाम्यात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लिहिले आहे की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या डॉक्टरांबद्दलच्या वागणुकीचा बचाव करण्यासाठी “काही सांगायचं नाही” आणि त्यांनी त्यांच्या मुलीने मारहाण केलेल्या डॉक्टरची माफी मागितली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही प्रकारे आपल्या मुलीच्या वर्तनाचे समर्थन करणार नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही बटालियन आहे की संपूर्ण सेना? शेकडो बदक रस्त्यावर सैन्यासारखे कूच करू लागले, ट्रॅफिकच थांबवली!

खरं तर, डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने इंडियन मेडिकल असोसिएशन, मिझोरामच्या सदस्यांनी निषेध केला आणि डॉक्टरांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी काळे बिल्ला लावले. व्हायरल व्हिडीओनंतर सुरू झालेल्या निदर्शनांमुळे मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली.