Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला फक्त दोन मिनिटे लेकीला भेटण्यासाठी तुम्हाला एका पोलीस कर्मचारीची धडपड दिसेल. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.
आई ही आई असते. आईचं नातं हे सर्व नात्याहून अधिक श्रेष्ठ असतं. हे एक असं नातं आहे जी कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थ वृत्तीने मुलांची काळजी घेते आणि त्यांच्यावर खूप प्रेम करते. आईच्या नात्याची तुलना आपण कोणत्याही नात्याबरोबर करू शकत नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका आईचे बाळाविषयीचे प्रेम दिसेल.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका ट्रेनमधील आहे. ही ट्रेन एका स्टेशनवर येत असते. ट्रेनच्या डब्यात एक पोलीस कर्मचारी दरवाज्यावर उभी दिसतेय आणि ट्रेन थांबण्याची वाट पाहतेय. जेव्हा ट्रेन थांबते तेव्हा एक तरुण एका चिमुकलीला घेऊन येतो आणि या पोलीस कर्मचारीच्या हातात देतो. तेव्ही ही पोलीस कर्मचारी तिला मिठीत घेऊन तिचा लाड करते. फक्त दोन मिनिटे लेकीला भेटल्यानंतर पोलीस कर्मचारीच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसतो.आईला पाहिल्यानंतर चिमुकली सुद्धा खळखळून हसताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. काही लोकांना त्यांच्या लहान मुलांची आठवण येईल. आई लेकीच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : घरच्या घरी बनवा हळदीपासून कुंकू! आजीबाईंनी संगितली ट्रिक, पाहा Viral Video

cops_vishakha2601 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुंबईवरून नागपूर ला जाताना मधेच लासलगाव स्टेशन वर फक्त दोन मिनिटे मुलीला भेटण्यासाठीची आईची तडफड. हा क्षण आई कधीच विसरू शकत नाही. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “जगाच्या बाजारात सगळे काही मिळते पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “आई ही शेवटी आईच असते. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या आईची आठवण आली. देवाने माझी आई माझ्या आयुष्यातून कायम नेली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती खुश आहे बाळ. पोलीस असलेल्या प्रत्येक आईच्या आयुष्यात संघर्ष आणि तळमळ नक्की आहेच.”