नागालँडमधील धक्कादायक घटनेमुळे देशात खळबळ उडाली आहे. ऑफ ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याने एका कुत्र्यावर ३० पेक्षा जास्त गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण या सुदैवाने क्रूर हल्ल्यातून कुत्र्याचा जीव वाचला आहे. सध्या नोह्स आर्क येथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण येथे वाचा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिवसाढवळ्या घडली आहे. नागालँड पोलिसांच्या तोशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याने एका कुत्र्यावर शॉट गनने अनेक वेळा गोळ्या घातल्या आहेत. कुत्र्याचा मालक या घटनेचे साक्षीदार आहेत असे समजते. कुत्र्याला अनेक जखमा होऊनही सुदैवाने तो बचावला आहे.पण हिंसाचाराच्या कृत्यामुळे कुत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपण शस्त्राचा वापर केल्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल

या घटनेची माहिती दिल्ली ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या कार्यकारी समितीचे सदस्य आशेर जेसुडोस यांना देण्यात आली आणि त्यानंत त्यांनी एफआयआर दाखल करण्यात केलाला. ही एफआयआर भारतीय दंड संहिता, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा – “थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

इंस्टाग्रामवर streetdogsofbombay नावाच्या पेजवर या जखमी कुत्र्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. तसेच एफआयआरची फोटो देखील जोडण्यात आला आहे. ही पोस्ट शेअर करताना, संबधित पोलीस अधिकऱ्याविरोधात गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता जलद आणि निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे असे सांगितले जात आहे. तसेच कुत्र्याला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जात असून कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धमकावेल जात आहे, असेही या पोस्टमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा – “माणसाने माणसाशी माणसासम वागणे”! भुकेल्या श्वानाला तरुणाने खायला दिले बिस्किट; पाहा सुंदर व्हिडीओ

या प्रकरणाविरोधात नागालँडमध्ये तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, संतापाची लाट उसळलेली असताना, प्राण्यांना सन्मानाने व करुणेने वागवले जाईल याची खात्री करण्यासाठी लोक निर्धाराने एकत्र आले आहेत. सोशल मीडियावर #JusticeforTerry नावाचा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.