Nurse On Scooty In Pateint Wards : देशभरातील सरकारी रुग्णालये ही आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांच्या सेवेसाठी असतात. या रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांच्या उपचारांमुळे रुग्ण चांगल्याप्रकारे बरा होतो असे अनेकदा ऐकायला मिळते. मात्र अपुऱ्या सुविधा, अस्वच्छ परिसर आणि उपचारांसाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे ही सरकारी रुग्णालये नेहमीच चर्चेत येतात. सध्या उत्तर प्रदेशातील असेच एक सरकारी रुग्णालय खूप चर्चेत आलयं. पण, ते वरील गोष्टींमुळे नाही तर नर्सच्या विचित्र प्रतापामुळे… या सरकारी रुग्णालयातील एक नर्स चक्क स्कूटीवर बसून रुग्णांच्या वॉर्डमध्ये फिरते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय, जो पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

नर्सच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना मनस्ताप

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील ही घटना आहे, ज्यात स्टाफ नर्सचा मनमानी कारभार दिसून येतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला स्टाफ नर्स डोळ्यावर गॉगल लावून स्कूटीवर बसून थेट रुग्णांच्या वॉर्डात गेली. ती स्कूटी घेऊन रुग्णालयाच्या आत शिरली, ज्यामुळे कॉरिडॉरमध्ये उपचारासाठी बसलेल्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रुग्णालयातील कॉरिडॉरमध्ये रुग्णांची रांग लागली होती, काही रुग्ण तर खालीच बसले होते, मात्र त्यातूनही वाट काढत ही नर्स चक्क वॉर्डमध्ये स्कूटी घेऊन शिरली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीएमओने या प्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Mother monkey slaped her baby monkey
अगं, आई मारू नको! आगाऊ पिल्लाला माकडिणीकडून बेदम चोप; VIDEO पाहून येईल हसू
Jitendra Awhad Slams Uddhav Thackeray Saying Balasaheb Had To Request But Viral Video
“८६ वर्षांच्या वडिलांना ५० वर्षांच्या..”, जितेंद्र आव्हाडांनी शेवटी सुप्रिया सुळेंना सुनावलं? Video चं ‘उद्धव ठाकरे’ कनेक्शन पाहा
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
renuka shahane chitra wagh
मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या, “तुमचं टायमिंग…”

क्षणात होत्याचं नव्हतं! भरधाव कारने एकाच वेळी उडवले चौघांना; अंगाचा थरकाप उडविणारा VIDEO

रुग्णालयातील नर्सच्या या मनमानी कारभाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारावर जोरदार टीका होत आहे. रुग्णालयातील कर्मचारीच सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या नर्सवर कडक कारवाई करण्याची मागणी करत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हापूरमधील एका सरकारी रुग्णालयात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. जिथे रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स ढोल-ताशांवर बेभान होऊन नाचत होते. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यात रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना सोडून आतील वॉर्डमध्ये जाऊन नाचत असल्याचे दिसतेय. हापूर जिल्ह्यातील गढ रोडवर असलेल्या कम्युनिटी हेल्थकेअर सेंटरमधील ही घटना आहे. भर रुग्णालयात ढोलाच्या तालावर डॉक्टर आणि नर्स नाचत असताना रुग्ण उपचारांसाठी जोरजोरात ओरडत होते. या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.