Viral Video: जीवनात आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतो. आपल्या कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी धडपड करत असतो. पण, अनेक तरुण मंडळी नोकरीची तक्रार करतात. तर काही जण नोकरी लवकर सोडून निवृत्तीची योजनाही आखत असता. मात्र निवृत्तीनंतर आपण कसे आयुष्य जगू याचे नियोजन करतो का? नाही… कारण वयाच्या ६० वर्षानंतर अनेक जण कुटुंबाला वेळ देत आराम करणे पसंत करतात. पण, तामिळनाडूची एक महिला याला अपवाद आहे.

भारतीयांचा विचार केल्यास त्यांच्यासाठी ६० वर्षानंतरचे आयुष्य खूप महत्त्व आहे. त्याची काही कारणे अशी भारतातील बहुसंख्य लोक हे व्यावसायिक असतात किंवा असंघटीत क्षेत्रात काम करतात. त्यांना राज्य सरकार किंवा नोकरी देणाऱ्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. तर मग अशावेळी मुलाबाळांवर निर्भर राहायचं की, काही छोटं-मोठं काम करायचा असा प्रश्न समोर उभा राहतो. पण, तामिळनाडूमधील ही आजी एकटी पूर्ण कुटुंब सांभाळते आणि घरोघरी जाऊन घरातील कामे करते व महिन्याला सात हजार रुपये पगार तिला मिळतो. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ.

Loksatta chaturang article about children who think they own their parents money
सांदीत सापडलेले…! मालक कोण?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
harassment of married woman in dombivli by husband and in law for money
बकरी पालन व्यवसायासाठी माहेरहून २० लाख आणले नाही म्हणून डोंबिवलीत विवाहितेचा छळ
Engineer turned farmer
Success Story: इंजिनिअर झाला शेतकरी… आरोग्यासाठी आयटी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून केली शेती; वर्षाला लाखोंची कमाई
Nirmala shekhawat Success Story
Women Success Story : पतीचा मृत्यू आणि लॉकडाऊन…तीन मुलांच्या पालनासाठी व्यवसायाची सुरुवात; आज ३० महिलांचे कुटुंब सांभाळते ही महिला
school girl sexual abuse by relative in pune
गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा
minor girl was assaulted and threatened to throw acid
मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अँसिड फेकण्याची धमकी, ६० वर्षीय व्यक्तीला अटक
Success Story ramesh babu Inspirational journey
Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा

हेही वाचा…डान्स, भांडण नंतर आता नाश्ता… मेट्रोमधील महिलांचा ‘हा’ VIDEO पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्स; म्हणाले, ‘किमान त्या…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की,सोशल वर्कर व इन्फ्लुएन्सर मोहम्मद आशिक यांच्याशी केलेल्या संभाषणात आजी तिची भावनिक गोष्ट सांगते. बालम्मा असे आजीचे नाव आहे. आजी तिच्या नवऱ्याबरोबर राहते. तसेच तिचा मुलगा देवाघरी गेला असून त्यांच्या मुलीच लग्न झालं असून ती शेजारच्या गावात राहते. आजी दुसऱ्या घरात जाऊन मदतनीस म्हणून काम करते. सकाळी सात वाजता ती घराबाहेर पडते आणि दुपारी तीन वाजता घरी परतते. जे जमेल ते काम करून घर सांभाळते. पण, कुटुंब चालवण्यासाठी एवढे पैसे पुरत नाहीत म्हणून ती कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी कर्ज आणि चिटफंडवर अवलंबून राहावे लागते असे देखील ती सांगते.

हे सगळं ऐकून सोशल वर्कर व इन्फ्लुएन्सर मोहम्मद आशिक आजींना “मी काही यासाठी मदत करू शकतो का असे विचारतो?” यावर आजी फळांचा किंवा कलिंगडाच्या फळांचा स्टॉल चालू करून देण्याचा पर्याय सुचवते. त्यानंतर दुसऱ्या व्हिडीओत आजीची ही इच्छा सोशल वर्कर पूर्ण करताना दिसतो. सोशल वर्कर आजीसाठी खास कलिंगडाचा स्टॉल उघडून देतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abrokecollegekid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.