Premium

“मित्रांना भेटणे…” पीएम मोदींनी जॉर्जिया मेलोनींबरोबरच्या ‘त्या’ सेल्फीवर दिला रिप्लाय; म्हणाले, “आनंद…”

Melodi Selfie: पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे ट्विट रिट्विट करत त्यावर रिप्लाय दिला आहे.

PM Modi responds to Italy pm Giorgia Melonis Melodi post that broke Internet
"मित्रांना भेटणे…" पीएम मोदींनी जॉर्जिया मेलोनींच्या 'त्या' सेल्फीवर दिला रिप्लाय, म्हणाले, "आनंद…" (photo – @narendramodi twitter and social media)

Italy PM Giorgia Meloni Shares Selfie With PM Modi : संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये हवामान बदलासंदर्भात आयोजित COP-28 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मोदींनी जगभरातील नेत्यांची भेट घेतली. यामध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही समावेश होता. मेलोनी यांनी पीएम मोदींबरोबरचा एक खास फोटोही शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, मेलोनी यांनी एक्सवर पोस्ट केलेला (पूर्वीचे ट्विटर) तोच फोटो आता पंतप्रधान मोदींनी रिट्विट करत त्यावर रिप्लाय दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉर्जिया मेलोनी यांनी पीएम मोदींसोबत काढलेला सेल्फी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, COP-28 मधील चांगली मैत्री…#Melodi. यात मेलोनी यांनी आपले आडनाव आणि PM मोदी यांचे आडनाव एकत्र करून #Melodi असा हॅशटॅग तयार केला. याच फोटोला रिप्लाय देत आता पीएम मोदींनी लिहिले की, “मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.”

दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी आणि मेलोनी या आडनावांचा वापर करून तयार केलेला हॅशटॅग #Melody सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होताना दिसत आहे. विशेषत: एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) युजर्स #Melody चा वापर करून मजेशीर पोस्ट, मीम्स शेअर करताना दिसत आहेत.

जॉर्जिया मेलोनींनी “#Melodi” म्हणत पीएम मोदींबरोबरचा ‘तो’ सेल्फी केला पोस्ट; नेटकरी म्हणाले, “जस्ट लुकिंग लाईक…”

दरम्यान, COP-28 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्यांच्या फोटोशूटमध्ये पीएम मोदी आणि जॉर्जिया मेलोनी एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसले. या दरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm modi responds to italy pm giorgia melonis melodi post that broke internet sjr

First published on: 02-12-2023 at 17:38 IST
Next Story
VIDEO : विद्यार्थीनीने सादर केले सुंदर शास्त्रीय नृत्य, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “हीच आपली संस्कृती…”