Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, रस्ते, खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतात. पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ पाहून तर अनेकदा हसू आवरत नाही. सध्या अशीच एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे पण या पाटीवर भावनिक संदेश लिहिला आहे. ही पुणेरी पाटी घराच्या बाहेर लटकवली नाही तर ऑटो रिक्षाच्या मागील बाजूला लिहिलेय. ऑटो रिक्षावर लिहिलेलं वाक्य वाचून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a beautiful emotional message for father wrote on auto rickshaw video goes viral)

हा व्हायरल व्हिडीओ पुण्याच्या ट्रॅफीकमधला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की एका कार चालकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. कारच्या पुढे उभ्या असलेल्या रिक्षेवर एक सुंदर वाक्य लिहिलेले होते. ते वाक्य असे होते – “कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील.” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजची पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी. पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या खरंच वाचण्यासारख्या असतात.”

हेही वाचा : २९ मे पंचांग: श्रावण नक्षत्रात मेष ते मीन राशींवर बरसणार सुखाच्या सरी; इंद्र योगासह तुमच्या राशीत कोणते बदल आज घडणार, पाहा

वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य हे अपूर्ण आहे. वडील अनेकदा व्यक्त होत नाही पण नेहमी आपली काळजी घेतो, आपल्यावर जीव लावतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आईविषयी बऱ्याचदा लिहिले जाते पण वडिलांची महती खूप कमी लोक सांगतात. अशातच वडिलांसाठी लिहिलेला हा भावनिक संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : बस चालकाची हुशारी; सोनसाखळी चोराला असा पकडला, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील रिक्षावाले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला पुणेरी पाटी नाही तर पुणेरी ज्ञान म्हणावं लागेल” तर एका युजरने लिहिलेय, “वडील हे एक आभाळ आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नुसत्या पाट्या मोठ्या विचारांच्या असून फायदा नाही स्वभाव पण तसा असावा लागतो.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.