सध्या सोशल मीडिया हे एक व्यसन बनले आहे. त्याशिवाय सध्याची पिढी जगू शकत नाही. ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक तास सोशल मीडियावर घालवतात. अशात अनेक जण सोशल मीडियावर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जणू व्हायरल होण्याची शर्यतच सुरू आहे. अनेक जण इन्स्टा, फेसबुक, यूट्युबवर लाइक्स आणि फॉलोअर्स वाढविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रील बनवितात. अशाच प्रकारे एका तरुणीने रीलसाठी आपले ‘रिअल लाइफ’ धोक्यात घातले. या तरुणीने रीलसाठी एका गगनचुंबी इमारतीवरून लटकत जीवघेणे फोटोशूट केले; ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी एका उंच इमारतीवर उभी आहे. यावेळी ती एका तरुणाचा हात पकडून इमारतीच्या एका खांबावरुन खाली उतरते आणि लटकते. कोणतीही तार किंवा दोरीच्या मदतीशिवाय, ती फक्त त्या तरुणी त्या तरुणाचा हात पकडून हवेत लटकत होती.

इंडिगो विमानात चक्क झुरळांचा सुळसुळाट; संतापलेल्या प्रवाशाने VIDEO केला पोस्ट; म्हणाला, “भयंकर…”

यावेळी चुकूनही आधाराचा हात देणाऱ्या व्यक्तीचा हात सुटला असता किंवा तोल गेला असता, तर दोघांचाही मृत्यू अटळ होता. हा व्हिडीओ पाहून उंच इमारतीवर उभे राहून असा स्टंट करणे किती कठीण असते याची तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरेल यात शंका नाही.

हा व्हिडीओ @pharaohonX नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्रामवर लाइक्स मिळविण्यासाठी हे करणे योग्य आहे का, असा सवाल केला आहे. व्हायरल होणाऱ्या या पोस्टनुसार ही मुलगी रशियन मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे. तिचे नाव व्हिक्टोरिया ओडिंटकोवा आहे. कमेंटमध्ये असाही दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ यूएईचा आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अनेक जण या स्टंटला भयानक आणि धोकादायक म्हणत आहेत.