तुम्ही मागील अनेक वर्षांपासून एकच गाडी चालवत असाल तर तुम्हाला नक्कीच तिचा कंटाळा आलेला असेल. अर्थात अगदी गाडी खराब होण्यापासून ते त्याच त्याचपणाला कंटाळण्यापर्यंत अनेक कारणं यामागे असतील. मात्र कशीही असली तरी ती स्वत:ची गाडी असल्याने गाडीची काळजीही घेतोच. मात्र रशियामधील एका व्यक्तीने गाडीचा कंटाळा आल्याने ती हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने हजार फुटांवरुन खाली फेकली.

रशियामधील या व्हॉगरने स्वत:ची मर्सिडीज एमजी जी ६३ ही गाडी एक हजार फुटांवरुन खाली फेकली. या व्यक्तीने गाडी हेलिकॉप्टरला बांधून ती एक हजार फुटांवर नेण्यापर्यंतचा प्रवास रेकॉर्ड केला आहे. लेगोर मोरोझ असं या व्यक्तीचं नाव आहे. लेगोरची गाडी चालताना अनेकदा बंद पडायची. अनेकदा ही गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्येच असायची असं लेगोर सांगतो. या गाडीचे एवढ्या वेळा काम केलेलं की गॅरेजवाल्यानेही अनेकदा गाडीचे पुन्हा काम करुन देण्यास नकार दिला होता असा दावा लेगोरने या व्हिडिओमध्ये केला आहे. ही गाडी त्याने २०१८ मध्ये विकत घेतली होती. या गाडीची तेव्हाची किंमत २ लाख अमेरिकन डॉलर इतकी होती. (आजच्या घडीला भारतीय चलनानुसार या गाडीची किंमत २ कोटी २० लाख रुपये इतकी आहे.) असं असुनही गाडीचे सतत काम निघत असल्याने लेगोर वैतागला होता. अखेर सततच्या या त्रासाला कंटाळून लेगोरने अनोख्या पद्धतीने गाडीचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला.

Bumrah Gives Fan Purple Cap Video
VIDEO : बुमराहने पराभवानंतरही जिंकली चाहत्यांची मनं, एका खास फॅनला गिफ्ट केली पर्पल कॅप
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

लेगोरने काही जणांच्या मदतीने गाडी हेलिकॉप्टरला बांधून ती हजार फूटांवरुन खाली फेकण्यास सांगितले. याचा त्याने सात मिनिटांचा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गाडी हेलिकॉप्टरला बांधतो आणि हेलिकॉप्टर हवेत झेपावते. हजार फुटांवर गेल्यावर ही गाडी हवेतून खाली सोडून देण्यात येते. गाडी खाली पडल्यानंतर तिचा चक्काचूर झाला. व्हिडिओच्या शेवटी लेगोर हजार फुटांवरुन खाली पडल्यानंतर भंगार झालेल्या गाडीजवळ उभा असलेला दिसतो.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला पाच दिवसामध्ये लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.