viral video : विमानाच्या पंखावरून ‘त्याचा’ काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

हजारो फुट उंचावरून मारली उडी

आतापर्यंत ८१ हजारांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

काहींना जीवघेणे स्टंट करायला आवडतात. जीवाची पर्वा न करता अगदी बिंनधास्त ते स्टंट करतात. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण नेहमीच सोशल मीडियावर पाहत असतो. असे जीवघेणे स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एकाने चक्क विमानाच्या पंखावरून खाली उडी मारली आहे. planelovers91 या इन्स्ताग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर झाला आहे.
यात एका स्कायड्रायव्हरने विमानाच्या पंखावरून खाली उडी मारली आहे. जमीनीपासून हजारो फूट उंचावर हे विमान उडत आहे. सुरूवातीला हा स्कायड्रायव्हर विमानातून बाहेर येतो. अशातच तो स्कायड्रायव्हर गुडघ्यांवर टेकून विमानाच्या पंखापर्यंत शेवटच्या टोकाला जातो आणि तिथून खाली उडी मारतो. काही दिवसांपूर्वी अशाच एका स्कायड्रायव्हरचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्याने जवळपास २५ हजार फूटांवरून विमानातून जमीनीवर उडी मारली होती पण त्याच्याजवळ सुरक्षेसाठी पॅराशूट होते. परंतु इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या इन्स्ताग्राम व्हिडिओमध्ये स्कायड्रायव्हरकडे पॅराशूट दिसत नाही त्यामुळे त्याचा स्टंट हा धोकादायक तर होताच पण विमानातून पंख्याच्या शेवटच्या टोकापर्यंत चालत जाताना त्याचा तोल जराही गेला असता तर विमानाच्या पंख्यात जाऊन त्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू देखील झाला असता. आतापर्यंत ८१ हजारांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेक जणांनी तो इंटरनेटवर शेअर देखील केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Skydiver jumped off from the wing

ताज्या बातम्या