Viral video: साप आणि गरूड हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप दिसताच गरुड त्याच्यावर तुटून पडतो. साप आणि गरुडाच्या युद्धाचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये सोपी शिकार समजून गरुडाने सापावर हल्ला केला. परंतु त्याचा डाव उलटाच पडला. कारण साप देखील गरुडाची शिकार करण्याची तयारी करत होता. साप आणि गरुडामधील या घनघोर युद्धाचा शेवट पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

गरुड आणि साप यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. कधी गरुडाचे वजन सापापेक्षा जास्त असते तर कधी सापाचे वजन गरुडापेक्षा जास्त असते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गरुडाला सापाला गृहीत धरणं चांगलंच महागात पडलंय. व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गरुडाने सापाला आपल्या पंजेमध्ये कसे दाबले आहे, ते पाहताना साप पूर्णपणे अशक्त आणि थकलेला दिसेल. मात्र पुढच्याच क्षणी साप संपूर्ण लढाई उलटून टाकतो. साप आपल्यावर हल्ला करेल याची गरुडालाही कल्पना नसते. जर तुम्ही हा व्हिडीओ पुढे बघितला तर तुमच्या लक्षात येईल की गरुडाने सापाला आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करताच साप गेम फिरवतो आणि गरुडावर हल्ला करतो.

शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

साप पूर्णपणे गरुडाला गुंडाळतो आणि जोरात त्याला संपूर्णपणे दाबून टाकतो. साप गरुडाला ओवढ्या जोरात आवळतो की गरुडाची हाडे मोडतो. अशा परिस्थितीत, गरुड पूर्णपणे हार मानतो आणि साप ही लढाई जिंकतो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यामध्ये कमकुवत शत्रू बलवान शत्रूवर मात करतो. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट…” नवऱ्याच्या गरीबीत साथ देणाऱ्या ‘या’ महिलेचा VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स खात्यावरून शेअर केला गेला आहे, जो आतापर्यंत १३.३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर व्हिडिओला ३८ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले नव्हते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… साप हा साप असतो, त्याच्याशी पंगा कोणालाही महागात पडेल.