Mother And Sons Heart Warming Video : पृथ्वीवर आईला देवाचे रुप मानले जाते. जी आपल्या मुलासाठी प्रत्येक दु:ख सहन करायला तयार असते. नऊ महिने पोटात वाढवलेल्या लेकराला काही होऊ नये म्हणून ती गरज पडल्यास तिचा जीवही धोक्यात घालते. एकवेळ स्वत: उपाशी राहील, पण लेकरांना पोटभर खाऊ घालण्यासाठी, त्यांच्या कपड्या-लत्त्यासाठी ती रात्रंदिवस राबण्यास तयार असते. लेकरांच्या लहान लहान आनंदात ती तिचा आनंद मानते. सध्या सोशल मीडियावर आई आणि तिच्या लहान मुलांचा एक सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही आनंदाने आपसूक हसू येईल.

तुम्ही आतापर्यंत तरुण-तरुणींना प्रपोज करताना पाहिलं असेल, पण या व्हिडीओमध्ये चिमुकला चक्क आपल्या आईला प्रपोज करताना दिसतोय. अतिशय निरागस अश्या त्या चिमुकल्याने आईला एक फूल देऊन प्रपोज केले. अगदी लहानश्या कृतीतून त्याने आपल्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आणला. हा व्हिडीओ तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल.

निरागस चिमुकल्याचा चेहऱ्यावर आनंद आणणारा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्याच्या कडेला बसली आहे, यावेळी तिच्या मोठ्या मुलाने हाताने तिचे डोळे झाकले आहेत, जेणेकरून त्याचा लहान भाऊ आईला सरप्राइज करू शकेल. यावेळी आईच्या डोळ्यावरील हात काढताच, तिचा लहान मुलगा गुडघ्यावर बसला आणि हातातील एक फूल आईला दिले. हे दृश्य पाहून आईचे मनही आनंदाने भरून गेले. मग आईने मुलाच्या हातातील फूल स्वीकारत त्याचे चुंबन घेतले, यानंतर ती दोन्ही आनंदाने नाचू लागली. आई आणि तिच्या मुलांचे हे अप्रतिम प्रेम पाहून तुमचेही मन नक्कीच प्रसन्न झाले असले. आईच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मुलांनी केलेल्या कृतीचे आता नेटकऱ्यांकडूनही कौतुक होत आहे.

VIDEO : कोकण रेल्वेत तोबा गर्दी, प्रवाशांची पोलिसांकडून अडवणूक अन् बाचाबाची; पनवेल स्थानकात नेमके घडले काय?

आई आणि मुलांचा हा सुंदर व्हिडीओ @ThebestFigen नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा तो त्याच्या आईला फुले देण्यासाठी गुडघ्यांवर बसतो आणि नंतर आनंदाने उड्या मारू लागतो.

हा गोंडस व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट व्हिडीओंपैकी हा एक आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘आयुष्याचे खरे सौंदर्य आईच्या उपस्थितीत आहे.