बहुतेक घरांमध्ये पालक आपल्या मुलांना अभ्यासासाठी हट्ट करत असतात. मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या सतत पाठी लागावे लागते. सतत पाठी लागलं की कुठे अभ्यास पूर्ण करतात, अशा तक्रारी पालक एकमेकांजवळ करत असतात. यूपी बोर्ड २०२४ चा निकाल नुकताच जाहीर झाला. यूपी बोर्ड दहावी-बारावीचा निकाल २०२४ समोर येताच सोशल मीडियावर एक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया..

इंटरनेटवर कधी, काय आणि कसं व्हायरल होईल, याबद्दल काहीही सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. बाप-मुलाच्या नात्याबद्दल अनेकदा लिहिलं जातं. या दोघांमध्ये आदर आणि भीतीचे संमिश्र नाते आहे. बहुतेक मुले त्यांच्या आईच्या जवळ दिसतात आणि त्यांच्या वडिलांपासून आदरणीय अंतर राखतात. आता एका मुलाने चक्क आपल्या वडिलांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

(हे ही वाचा : तुफान राडा! दोन तरुणींची दे दणादण हाणामारी पाहून WWE विसरुन जाल, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन्… Video व्हायरल)

वडिलांची मार्कशीट सोशल मीडियावर शेअर

एका मुलाने आपल्या वडिलांची मार्कशीट सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा मुलगा म्हणतो की, त्याचे वडील त्याला पास होण्यासाठी वारंवार टोकत असतं. आता त्याला त्याच्या वडिलांच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेची मार्कशीट मिळाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, वडील दहावीत प्रत्येक विषयात नापास झाले होते. ही व्हायरल क्लिप लोकांनाही खूप आवडली आहे. मार्कशीटचा व्हायरल झालेला व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हे वृत्त लिहिपर्यंत हा व्हायरल व्हिडीओ चार लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला होता. हे ४१८ वापरकर्त्यांनी सेव्ह केले आहे आणि ३४५ जणांनी ते रिट्विटदेखील केले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बहुतांश लोक मुलाला सल्ला देत आहेत. “त्यांचा असा विश्वास आहे की, वडील स्वतःच अयशस्वी झाले होते, कदाचित म्हणूनच आपल्या मुलाच्या बाबतीत असे घडू नये असे त्यांना वाटते.” काही वापरकर्त्यांनी हसण्याच्या इमोजीसह ट्रेंडिंग व्हिडीओवर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.