भारतात जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक क्षेत्रांत जुगाडू लोकांनी नाव कमावले आहे. मोठे मोठे शास्त्रज्ञ व इंजिनियर्सदेखील यामुळे हैराण होतात. काही लोकांचं डोकं हे फारच वेगानं चालतं. ही मंडळी असे काही जुगाड शोधून काढतात की, जे पाहून खरंच थक्क व्हायला होतं. आता हाच जुगाड पाहा ना. सोशल मीडियावर सातत्याने अनेक भन्नाट व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. त्यामध्ये लोक उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसत आहेत. आता असाच एक जुगाड रिक्षाचालकाने केल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर उष्णतेपासून संरक्षणासाठी अनेक आश्चर्यकारक युक्त्या वापरल्या जात असल्याचे दिसत आहे. त्यांपैकीच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे; जो रखरखत्या उन्हात लोकांना मोठा दिलासा देत आहे. व्हिडीओतील रिक्षावाल्याचा देशी जुगाड पाहून तुम्हीही त्याचं भरभरून कौतुक कराल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या रिक्षाचं छत गोणीने पूर्णपणे झाकल्याचे दिसत आहे. ही गोणी खाली पडू नये म्हणून त्यानं त्यांना चांगल्या रीतीनं बांधलंही आहे. एवढंच नाही तर या गोण्यांमध्ये वाढलेलं गवतही दिसून येत आहे. त्या व्यक्तीनं रिक्षाचं छत आणि पोत्यांमध्ये काहीतरी ठेवलं असावं. त्यामुळे गवत वाढत आहे. त्यामुळेच ही रिक्षा एकदम वेगळी दिसत असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक अवाक झाले आहेत. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही, हे यावरून सिद्ध होतं.

(हे ही वाचा: वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट)

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर pooran_dumka नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडीओ १२.७ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे आणि सहा लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. या जुगाडू वृत्तीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने या जुगाडमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल लिहिताना, “टेम्पोच्या छताला गंज लागेल”, असे म्हटले आहे. असो! तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? याबाबत तुम्हीदेखील आपल्या गमतीशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.