डेव्हिड कोलंबो या जर्मनीतील १९ वर्षीय सायबर सुरक्षा संशोधकाने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा शोध लावला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, डेव्हिड एका फ्रेंच कंपनीसाठी सुरक्षा ऑडिट करत होता जेव्हा त्याला काहीतरी वेगळं आढळलं. कंपनीच्या नेटवर्कवर एक सॉफ्टवेअर प्रोग्राम सुरू झाला ज्यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकाऱ्या टेस्ला कारबद्दलचा सर्व डेटा उघड झाला. या डेटामध्ये कार कुठे चालवली गेली आणि सध्या कार कुठे आहे याची संपूर्ण माहिती होती. हा सगळा डेटा चुकून डेव्हिडच्या समोर आला, तो त्याबद्दल शोध घेत नव्हता.

एवढंच नव्हे, तर डेव्हिडने पुढे संशोधन केल्यावर त्याला कळले की तो टेस्ला वाहनांनाही कमांड देऊ शकतो, ज्यांचे मालक तो प्रोग्राम वापरत होते. यामुळे त्याला त्या कारची काही फंक्शन्स हायजॅक करण्यास सक्षम केले. ज्यामध्ये दरवाजे उघडणे आणि बंद करणे, संगीत चालू करणे आणि सुरक्षा वैशिष्ट्ये अक्षम करण्यासारख्या गोष्टींचा समावेश होता. त्यालात्याला कारच्या स्टीयरिंग, ब्रेकिंग किंवा इतर फंक्शनचा एक्सेस मिळाला नाही. डेव्हिडने या आठवड्यात त्याच्या शोधाबद्दल ट्विट केले. त्यांच्या या ट्विटमुळे कार हॅकिंगच्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर

डेव्हिडने सांगितले की त्याला युरोप आणि उत्तर अमेरिकेतील १३ देशांमध्ये २५ पेक्षा जास्त टेस्ला कार सापडल्या ज्या सहजपणे हॅक केल्या जाऊ शकतात आणि आणखी अशा शेकडो कार असू शकतात. दोष टेस्लाच्या वाहनांमध्ये किंवा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नाहीत, परंतु ओपन-सोर्स सॉफ्टवेअरच्या एका तुकड्यात आहेत जे त्यांना त्यांच्या वाहनांबद्दल डेटा संकलित आणि विश्लेषण करण्यास अनुमती देतात.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डेव्हिडने सांगितले की जेव्हा त्याच्या आईला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा तो १३ वर्षांचा होता. यावरून लक्ष वळवण्यासाठी त्याने कोडिंग सुरू केले. मात्र, त्याच वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर शाळेत त्याचे मन रमत नव्हते. जेव्हा तो १५ वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी एक याचिका दाखल केली जेणेकरून त्याला आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत जाण्याची परवानगी दिली जावी. मग त्याने त्याचा उर्वरित वेळ सायबर सुरक्षा कौशल्यांचा विस्तार करण्यात आणि सल्लागार कंपनी तयार करण्यासाठी वापरला. आता डेव्हिडची स्वतःची कोलंबो टेक्नॉलॉजी नावाची फर्म आहे.