माकडांचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा माकडे लोकांच्या हातातील खाण्याचे पदार्थ घेऊन पळून जातात. कित्येकदा मोबाईल, चश्मा अशा वस्तू घेऊन पळून जातात आणि काहीतरी खायला दिले तरच त्या परत करतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत येत असतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान एका चिमुकल्याच्या खांद्यावर येऊन बसलेल्या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर aamhichandgadi_official नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये,”एक चिमुकला दिसत आहे ज्याच्या डोक्यावर माकड बसले आहे. चिमुकला चांगलाच घाबरला आहे पण तो न रडता शांतपणे तिथेच उभा आहे. आसापासचे लोक त्याला शांत राहण्याचा सल्ला देत आहे. माकड चिमुकल्याच्या डोक्यात उवा शोधताना दिसत आहे. ते एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर उड्या मारत आहे. चिमुकल्याच्या खांद्यावरून खाली उतरण्याचे नाव घेत नाहीये. बराचवेळ शांतपणे उभा राहिलेल्या चिमुकल्याच्या धीर सुटत चालला आहे त्यामुळे तो डोळे बंद करून हाताने तोंड झाकून तसाच उभा राहतो. माकड मात्र त्याच्या खांद्यावर नुसत्या उड्या मारताना दिसत आहे.” व्हायरल व्हिडीओ नक्की कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा – सहा महिन्यानंतर नोकरी सोडून का जातात कर्मचारी? HR Executiveने केला मोठा खुलासा:

येथे पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C3uIVH9JxKA/?igsh=bGc5eGx0dXhhM2E%3D

हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ २० हजारपेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. चिमुकल्याच्या धाडसाचे अनेकजण कौतूक करत आहे. एकाने व्हिडीओवर कमेंट केली की, “किती धाडसी मुलगा आहे.” दुसरा म्हणाला, “मला आयुष्यात असा संयम ठेवता आला पाहिजे”

हेही वाचा – “क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video

तर काहींनी माकडाला खाली कसे उतरवण्याचे याबाबत सल्ले दिले आहे. एकजण म्हणाला, “त्याला केळ किंवा काहीतरी खायला दिले असते तरी लगेच उतरला असता”