Premium

VIDEO: धावती मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी अन्…

Viral video: दिल्ली मेट्रोत दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल मारामारी; नेटकरी म्हणाले, अ‍ॅनिमल पाहून आलात का?

Two man inside Delhi metro over Push and Shove for seat video goes viral
मेट्रोमध्ये दोन पुरुष एकमेकांशी भिडले

Viral video: ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मेट्रोमध्ये दोन पुरुष भांडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही महिलांची भांडणं पाहिली असतील मात्र आता मेट्रोमध्ये दोन पुरुष एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. हे दोघेही एकमेकांची कॉलर पकडून भांडण करत आहेत. दरम्यान काही प्रवासी या दोघांना थांबवण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र दोघेही एकायला तयार नाहीत. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे १४ फुटाचा अजगर कुठे लपून बसला होता पाहा; रेस्क्यूचा खतरनाक VIDEO व्हायरल

फ्री स्टाईल हाणामारी झाल्यानंतर इतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तर काही जण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.याचबरोबर आरोपी प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असेही प्रवाशांचं म्हणणं आहे. हाणामारीच चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two man inside delhi metro over push and shove for seat video goes viral srk

First published on: 06-12-2023 at 16:55 IST
Next Story
अर्जित सिंगचे ‘हे’ गाणे ऐकताच कुत्र्यानेदेखील लावला सूर; सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडीओ पाहा…