Viral Video: मेट्रोतून लाखो प्रवासी प्रवास करतात. मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचे काही विशिष्ट नियमसुद्धा आहेत आणि या नियमांचे पालन न केल्यास प्रवाशांना दंड भरावा लागतो. आतापर्यंत तुम्ही दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील. यात अश्लील डान्स करणे, रील्स बनवणे, मेट्रोत खाली बसून भजन करणे आदी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात पण आज दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यात दोन महिला मेट्रोत बसून ‘समोसा खात आहे आणि या महिलांना मेट्रोत खाद्यपदार्थ खाणं चांगलचं महागात पडलं आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. मेट्रोत अनेक प्रवासी प्रवास करत आहे. मेट्रोत दोन महिला चप्पल काढून सीटवर बसल्या आहेत. बघता बघता दोघी पिशवीतून समोसे काढतात आणि खाण्यास सुरुवात करतात. अगदी घरी बसल्यासारखं दोघीही समोसे खाताना दिसत आहे. तसेच यादरम्यान कचरा सुद्धा सीटखाली फेकताना दिसत आहे. एकदा पाहाच दिल्ली मेट्रोतील दोन महिलांचा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…विक्रेत्याची माणुसकी! २५ वर्षांपासून दररोज न विसरता देतो ‘तिला’ मोफत आईस्क्रीम; VIDEO तून पाहा हृदयस्पर्शी गोष्ट

व्हिडीओ नक्की बघा…

मेट्रोत पदार्थ खाणे किंवा कोणत्याही वस्तूची विक्री करणे मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे, हे माहीत असूनसुद्धा या दोन्ही महिला हातात समोसे घेऊन बसल्या आहेत आणि मजेत खाताना दिसत आहेत. मेट्रोत उपस्थित एक अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडिओला १.३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी कमेंट केल्या आहेत.एका यूजरने लिहिले की, “ती फक्त समोसे खात आहे, त्यात काय चूक आहे? तर दुसऱ्याने कमेंट केली की , ‘किमान ते भांडत किंवा नाचत तरी नाही नाहीत’. तर तिसऱ्याने कमेंट केली की,’मेट्रोमध्ये खाणे आणि पिणे प्रतिबंधित आहे’ ; अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना युजर्स दिसत आहेत.

डीएमआरसीचे कठोर नियम असूनही अशा घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये, ती अनेक प्रवाशांच्या उपस्थितीत बेली डान्स करताना दिसली.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @manishadancer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय आहे.