रेल्वे प्रवास करणे दिवसें दिवस अवघड होत चालेल आहे याची प्रचिती देणारे व्हिडीओ एकापाठोपाठ एक व्हायरल होत आहे. नुकताच गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एसी कोचमध्ये चढता न आलेल्या चिडलेल्या प्रवाशाने रागाच्या भरात चक्क रेल्वेच्या डब्याच्या दरवाज्याची काच फोडली आहे. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक्सवर घर के कलेश नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १९ एप्रिलाला शेअर केलेला फक्त ३२ सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जवळपास २ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडीओ कैफियन सुफरफास्ट एक्सप्रेसमध्ये घडला आहे.

हेही वाचा – चक्क झाडाला मिठी मारण्यासाठी ही कंपनी आकारतेय १५०० रुपये! नेटकरी म्हणे, “मार्केटमध्ये आला नवा Scam”

व्हिडीओमधील व्यक्तीचे म्हणणे होते की, “एसी- ३ कोचमध्ये जागा आरक्षित केली होती, परंतु तिकीट नसलेल्या प्रवाशांनी त्याला आत प्रवेश करण्यास नकार दिला.”

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, “रेल्वे डब्याच्या दारासमोर जमिनीवर बसलेल्या लोकांनी खचाखच भरलेला होता. प्रवाशाने लोकांना दरवाजा उघडण्यास सांगितले तेव्हा तिथे बसलेल्या एका व्यक्तीने त्याला सांगितले, “जागा नाही.” संतप्त झालेल्या प्रवाशाने दाराची काच फोडली, ज्यामुळे पुढे मोठा गोंधळ उडाला.

गर्दीने भरलेल्या डब्यांचे असे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट केले जातात, ज्यामुळे प्रवाशांना पाठिंबा देणारे अधिकृत खाते असलेल्या रेल्वे सेवेकडून प्रतिसाद मिळतो.

हेही वाचा – तुम्ही खाऊ शकता का हा निळ्या रंगाचा भात? Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

या आठवड्याच्या सुरुवातीला काशी एक्स्प्रेसच्या AC-2 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्याच्या प्रवासातील एक व्हिडिओ शेअर केला होता जो१९ एप्रिल रोजी व्हायरल झाला होता. या छोट्या क्लिपमध्ये जमिनीवर बसलेल्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या डब्याची भीषण अवस्था दाखवली होती. डब्यात एसी चालत नव्हता, जेवण किंवा पाणीही दिले जात नसल्याचा दावाही प्रवाशाने केला आहे.

भारतीय रेल्वेशी संबंधित आणखी एका घटनेत, विना तिकीट प्रवास करताणाऱ्या महिलेचा सहप्रवाशांबरोबर वाद घालतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या महिलेच्या वर्तणूकीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिने जबरदस्तीने ताब्यात घेतलेली जागा रिकामी करण्यास नकार दिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओला रेल्वे सेवेने तातडीने प्रतिसाद दिला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unable to board ac coach angry passenger breaks train doors glass viral video snk
Show comments